सध्याच्या धावत्या आणि धकाधकीच्या जीवनात थोडी शांतता किंवा रिलॅक्स व्हावेसे वाटले तर सर्वजण आधार घेतात संगीताचा. कारण त्यामुळे त्यांना थोडी मन:शांती मिळते. काही तर रोज संगीत ऐकतात कारण त्यांच्यासाठी संगीत जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. असे लोक नेहमी चांगली ऑडियो क्वालिटी असलेल्या डिवायसेसच्या शोधात असतात. कमी किंमतीत चांगली ऑडियो क्वालिटी देणा-या डिवाईसच्या आपण नेहमी शोधात असतो. येथे आम्ही अशी ऑडियो डिवायसेसविषयी बोलत आहोत, जे ५००० च्या आत ही येतात आणि उत्कृष्ट ऑडियो क्वालिटीही देतात.
Logitech X 300
किंमतीच्या तुलनेत ह्या स्पीकरची ऑडियो क्वालिटी खूपच चांगली आहे. ह्याची किंमत आहे ३००० रुपये आणि हा खूपच स्पष्ट आणि मोठा ऑडियो देतो. ह्याचे डिझाईन खूपच चांगले आहे आणि हा १० तासांची बॅटरी लाइफ देतो. हा एक खूपच चांगला आणि पोर्टेबल ब्लूटुथ डिवाइस आहे. हा आपल्याला नक्कीच आवडेल.
Beyerdynamic's MMX 102iE
हा एक बेस्ट लूकिंग IEM हेडफोन तर नाही, मात्र ४,४०० रुपयाच्या किंमतीत उत्कृष्ट ऑडियो क्वालिटी देणारा हेडफोन आहे. ह्याची रचना खूपच चांगली आहे. ह्यात एक मायक्रोफोनसुद्धा आहे. हा भारतातील एक चांगला इन-इयर हेडफोन आहे.
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Beyerdynamic's MMX 102iE ईयरफोन ४,४०० रुपयात
Creative Outlier
ह्यात बिल्ट इन MP3 प्लेअर आहे. हा मायक्रो-एसडी कार्डलासुद्धा सपोर्ट करतो. हा एक ब्लूटुथ आणि NFC आधारित वायरलेस डिवाइस आहे. हा एकदा चार्ज केल्यावर १० तास काम करतो. तथापि ह्याची बिल्ट इन क्वालिटी जास्त चांगली नाही. मात्र ह्यात खूप चांगले फीचर्स आहेत. हा ५००० च्या किंमतीत येणारा वायरलेस ऑन-इयर हेडफोन आहे.
F&D F3000U
हा एक 5.1 सराउंड स्पीकर सिस्टम आहे. ह्यात वूड चेसी दिली गेली आहे. ह्याचा ऑडियो आउटपुट 5000W आहे. ह्यात USB प्लेबॅकसुद्धा आहे. हा SD कार्डला सुद्धा सपोर्ट करतो.
Audio Technica M30x
५००० च्या सेगमेंटमध्ये येणारा आणि उत्कृष्ट ऑडियो क्वालिटी देणारा असा हा डिवाइस आहे. ह्याचे प्रदर्शन खूपच चांगले आहे. ह्याचा आवाजसुद्धा खूप चांगला आहे. ह्याचे डिझाईनसुद्धा खूपच उत्कृष्ट आहे.