तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Apr 18 2016
तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स

सध्याच्या धावपळीच्या युगात अगदी घड्याळ्याच्या काट्यावर चालणा-या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांनाच स्वत:कडे, स्वत:च्या आरोग्यावर लक्ष द्यायला वेळच नसतो. कामाचा वाढणारा ताण, आणि त्यामुळे खाण्यापिण्याचा बदलणा-या वेळा अशा तणावपूर्ण जीवनाचा आपल्या शरीरावरही तितकाच घातक परिणाम होताना दिसतो. अशावेळी आपल्या बिझी शेड्यूलमधून व्यायाम, योगा, योग्य तो आहार ह्याकडे लक्ष देण्यासाठी किंवा ह्याकरिता विशेष क्लासेस, जिम लावण्याचीही उसंत नसते. त्यामुळे ह्यावर एक तोडगा म्हणून आम्ही आज तुम्हाला असे अॅप्स सांगणार आहोत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या  नियमित व्यायाम, योगा आणि आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष द्याल. आणि ह्यासंंबधीचा अभ्यास तुम्ही केव्हाही, कुठेही करु शकता. त्यामुळे तुमचा जास्त वेळही वाया जाणार नाही. मुख्य म्हणजे हे सर्व अॅप्स मराठी भाषेतूनच उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे अॅप्स.....

तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स

जिम गाइड (मराठी)

येथे तुम्हाला मराठीतून तसेच काही फोटोंच्या माध्यमातून योग्य तो व्यायाम करण्याची क्रिया समजावली जाईल. तसेच येथे तुम्हाला शाकाहारी आणि मांसाहारी डाएटविषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगण्यात आल्या आहेत. तसेच जर तुम्हाला एखादा आजार असेल तर ह्यातील व्यायाम प्रोग्राम सुरु करण्याआधी डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या.

तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स

योगासना इन मराठी

ह्या अॅप्समध्ये तुम्हाला योगामधील विविध आसने, ती करावयाची पद्धत, प्रकार ह्याविषयी माहिती दिलेली आहे. तसेच काही ठराविक आसने करताना कोणकोणते नियम पाळावेत ह्याविषयीही ह्यात सविस्तर माहिती दिली आहे. तसेच एकदा का तुम्ही हा अॅप डाउनलोड केला की, तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा ऑफलाइनही ह्या अॅपच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता.

तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स

ब्युटी टिप्स इन मराठी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही स्वत:च्या चेह-याकडे किंवा त्वचेकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. अशा वेळी त्वचा काळी पडणे, चेह-यावर पिंपल्स येणे यांसारखे अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी तुम्हाला योग्य तो सल्ला देईल हा ब्युटी टिप्स इन मराठी अॅप्स. ह्या अॅप्सच्या माध्यमातून घरगुतीरित्या आपल्या त्वचेची, चेह-याची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी माहिती दिलेली आहे. केस गळणे, चेहरा काळवंडणे यांसारख्या अनेक समस्येविषयी ह्यावर योग्य तो सल्ले इथे सांगण्यात आले आहेत.

तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स

आयुर्वेदिक हेल्थ अॅप

ह्या आयुर्वेदिक टिप्स, तसेच लहान मुलांच्या आरोग्याबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे ह्याबाबत माहिती दिली आहे. तसेच सौंर्द्यविषयी महत्त्वाच्या टिप्स, योग्य आहार, फिटनेस फंडा, योगासने, घरगुती उपाय ह्याविषयीही माहिती दिलेली आहे.

तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स

हेल्थ मराठी

ह्यामध्ये तुम्हाला मराठीतून मधुमेह, कर्करोग, ह्रद्यविकार, अस्थमा, किडनीचे विकार ह्याची लक्षणे, त्यावरील उपचाराचे पर्याय आणि घ्यावयाची काळजी ह्याविषयी माहिती दिली आहे. तसेच ठराविक आजारावर आपला आहार कसा असला पाहिजे, वजन कमी करण्यासाठी, व्यायाम नियमित करण्यासाठी काय केले पाहिजे ह्याविषयीही माहिती दिलेली आहे.