तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (AI) बद्दल अलीकडे बरेच काही ऐकत असाल. AI चे नवनवीन प्रयोग पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार. हॉलीवूडमध्ये रोबोट्सने जगाचा ताबा घेतला असला तरीही, AI हे आपल्यासाठी काही नवीन नाही. ही संकल्पना अनेक दशकांपासून एका किंवा दुसर्या स्वरूपात आपल्या सभोवताली अस्तित्वात आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात Artificial Intelligence आता सामान्य होत चालले आहे. AI आधीच अनेक उपकरणे आणि अनुप्रयोगांमध्ये एकत्रित केले गेले आहे, जे आपण दररोज वापरतो.
चला तर मग आज आपण आपल्या सभोवतालच्या दैनंदिन जीवनातील AI च्या सर्वोत्तम उदाहरणांवर चर्चा करूयात. ज्याबद्दल तुम्हाला माहिती देखील नसेल. आहे का? बघा यादी.
AI – नेव्हिगेशन ऍप्सचे सर्वात जुने आणि सर्वात जास्त वापरले जाणारे अप्लिकेशन आहे. Waze आणि Google Maps सारखी GPS ऍप्स वापरकर्त्यांना रहदारी, बांधकाम आणि हवामान यांसारख्या बाबी लक्षात घेऊन वापरकर्त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानासाठी सर्वोत्तम मार्ग प्रदान करण्यासाठी AI वापरत आहेत.
नेव्हिगेशन ऍप्सप्रमाणेच, शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ काही नवीन नाहीत. नवीन काय आहे तर ते तयार करण्यासाठी AI चा वापर केला जात आहे. प्रथम, सर्वशक्तिमान मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे. AI चा वापर तुम्ही तुमच्या फीडवर पाहत असलेला कंटेंट पर्सनलाइझ करण्यासाठी, तुम्ही नेहमी सर्वात संबंधित व्हिडिओ पाहत आहात, याची खात्री करण्यासाठी केला जातो.
अलिकडील काळात Uber आणि Lyft सारखी Rideshare ऍप्स अधिक लोकप्रिय झाली आहेत आणि त्यांच्या यशात AI ने मोठी भूमिका बजावली आहे. जवळपासच्या ड्रायव्हर्सशी जुळणार्या रायडर्सपासून ते आपोआप भाडे मोजण्यापर्यंत, AI शक्य तितक्या अखंड आणि कार्यक्षम बनवण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेत वापरले जाते.
AI ची सर्वात रोमांचक आणि 'गेम चेंजिंग' उदाहरणे व्हिडिओ गेम्समध्ये बघायला मिळतील. वास्तववादी ग्राफिक्सपासून ते विश्वासार्ह कॅरेक्टर इंटरॅक्शनपर्यंत AI-आधारित सॉफ्टवेअर हळूहळू गेमिंग उद्योगात क्रांती घडवत आहे.
फेशियल रकॉग्निशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान AI वर अवलंबून असते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांनुसार ओळखता येते. ही टेक्नॉलॉजी सिक्योरिटी आणि सर्व्हिलन्स, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आणि अगदी मार्केटिंगसह विविध कारणांसाठी वापरली जाऊ शकते.
AI 3D फोटोग्राफीमध्ये, कॅप्चर आणि प्रक्रिया या दोन्ही टप्प्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उदाहरणार्थ, Google Pixel 4a मध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, जो तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त उपकरणांशिवाय 3D फोटो घेण्यास अनुमती देतो.
Smart Assistants दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. Amazon चे अलेक्सा आणि गुगल असिस्टंट सर्वाधिक वापरले जात आहेत. अलार्म सेट करणे, म्युझिक लावणे आणि तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये प्रोडक्ट जोडणे यासारखी कामे करण्यासाठी ही उपकरणे AI चा वापर करतात.
दैनंदिन जीवनातील AI चे दुसरे उदाहरण म्हणजे स्पॅम फिल्टर्स होय. जे अवांछित ईमेल ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी AI वापरतात. बर्याच ईमेल प्रदात्यांकडे आता काही प्रकारचे स्पॅम फिल्टरिंग आहे.
वापरकर्त्यांना कंटेंट रिकमेंड करण्यासाठी देखील AI चा वापर केला जातो. उदाहरणार्थ, Netflix आणि Amazon सारख्या स्ट्रीमिंग सेवा तुमच्या वॉचिंग हिस्ट्रीच्या आधारे तुम्हाला आवडतील, असे चित्रपट आणि शो सुचवतात.
सिक्योरिटी आणि सर्व्हिलन्ससाठी स्मार्ट होम डिव्हाइसेस असतात. त्याबरोबरच. तुम्ही तुमचे घर अधिक आरामदायक आणि सोयीस्कर बनवण्यासाठी AI वापरू शकता. उदाहरणार्थ, रुम्बा हा रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर आहे, जो तुमचे फ्लोअर्स आपोआप क्लीन करतो.
फायनान्शिअल टेक्नॉलॉजीजमध्ये AI चा वापर केला जातो. ऑनलाइन बँकिंग हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. खरं तर, प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवण्यासाठी AI चा वापर केला जात आहे.
नमुना विश्लेषणासाठी AI उत्तम आहे आणि आपल्यापैकी बरेच जण क्रेडिट कार्ड वापरतात. तुम्ही व्यवहार केला आहे का असे विचारणारा बँकेकडून तुम्हाला कधीही कॉल आला असल्यास, तो बहुतेक AI चा परिणाम असू शकतो.
सर्वांनी टेस्लाच्या सेल्फ-ड्रायव्हिंग कारबद्दल ऐकले आहे, परंतु या प्रगत तंत्रज्ञानावर केवळ त्या काम करत नाहीत. खरं तर, बहुतेक कार उत्पादक आता स्वायत्त वाहनांमध्ये (AV) वर काम करत आहेत. सेन्सर्स, कॅमेरे आणि AI यांचा वापर करून स्वत: चालवू शकतील अशा कार तयार करणे हे कंपन्यांचे ध्येय आहे.
ऑनलाइन खरेदी करताना वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी AI चा वापर केला जात आहे. AI चा वापर प्रोडक्ट रिकमेंडेशनसाठी आणि कस्टमर्स सपोर्ट इ. साठी देखील केला जातो.
मोबाइल कीबोर्ड ऍप्सच्या नवीनतम आवृत्त्यांमध्ये वापरकर्ता-अनुकूल अनुभव देण्यासाठी ऑटोकरेक्शन आणि भाषा शोधण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. AIच्या मदतीने, हे ऍप्स चुका सुधारू शकतात आणि भाषांमध्ये स्विच देखील करू शकतात.
वरील सर्व उदाहरणांवरुन हे स्पष्ट होते की, AI बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण त्याची क्षमता फक्त वापरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात, आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक AI ची आणखी उदाहरणे पाहायला मिळतील, ज्यामुळे आपली लाइफस्टाइल आणि कार्य करण्याची पद्धत बदलेल.