दिवसेंदिवस फोटो काढण्याचे आणि फोटोग्राफीचे वाढते प्रमाण पाहता, बाजारात अनेक नवनवीन वैशिष्ट्यासह अनेक कॅमेरे पाहायला मिळतायत. मात्र त्यातही उत्कृष्ट दर्जाचे फोटो काढणा-या कॅमे-यांची किंमत लाखाच्या घरात असल्यामुळे असे कॅमेरे सर्वसामान्यांना घेणे परवडणारे नाही. मात्र जर तुम्हाला त्या कॅमे-यांप्रमाणे चांगले फिचर्स ३५,००० किंमतीत मिळाले तर किती बरे होईल, नाही का?, म्हणून आम्ही तुमच्यासाठी असे काही कॅमेरे आणले आहेत, जे 35K किंमतीत येतात आणि तेही आकर्षक वैशिष्ट्यांसह. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे कॅमेरे.
ह्या कॅमे-यामध्ये आपल्याला ते सर्वकाही मिळत आहे, हे एका प्रोफेशनल कॅमे-यामध्ये मिळते. हा कॅमेरा कमी किंमतीतला उत्कृष्ट कॅमेरा असू शकतो. ह्या कॅमे-यामध्ये 24.2 मेगापिक्सेलचा APS-C इमेज सेंसर दिला आहे. त्याशिवाय ह्यात EXPEED 4 इमेज प्रोसेसरसुद्धा दिला गेला आहे. DSLR कॅमे-यांविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला ह्या विभागात ह्यापेक्षा चांगला कॅमेरा मिळणार नाही.
कॅनन EOS 700D
हासुद्धा स्वत: मध्ये उत्कृष्ट असा कॅमेरा आहे, असे आपण बोलू शकतो. ह्यात 18 मेगापिक्सेलचा APS-C कॅमेरा सेंसरसह कॅननचा EXPEED 5 इमेज प्रोसेसरसुद्धा आहे. ह्याची किंमत ३०,३०७ रुपये आहे.
सोनी अल्फा 500L
ह्याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, 26,799 रुपयाच्या किंमतीत हा एक उत्कृष्ट कॅमेरा आहे. हयात २०.१ मेगापिक्सेलचा APS HD CMOS सेंसर मिळत आहे, जो तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल. ह्या कॅमे-याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट फोटो काढू शकता.
कॅनन पॉवरशॉटG9X
30,300 रुपयाच्या किंमतीत येणारा हा कॅमेरासुद्धा फोटोग्राफीसाठी एक उत्कृष्ट कॅमेरा आहे, आणि जो फोटोग्राफीसाठी एक चांगला अनुभव देतो. ह्याच्या माध्यमातून आपण एखाद्या प्रोफोशनल फोटोग्राफर्सप्रमाणे फोटो घेऊ शकता.
सोनी सायबरशॉट RX100 II
सोनीच्या इतर कॅमे-यांप्रमाणे हा कॅमेरासुद्धा स्वत:तच एक खास कॅमेरा आहे. ह्यात आपल्याला 1 इंच एक्समोर R CMOS मिळत आहे, जो २०.२ मेगापिक्सेल सेंसरच्या माध्यमातून आकर्षक फोटो घेतो. ह्याची किंमत 24,499 रुपये आहे. ह्या किंमतीत हा एक चांगला कॅमेरा असल्याचे सांगू शकतो.
निकॉन कुलपिक्स P900
ह्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्याची किंमत २९,००० रुपये आहे, मात्र हा एक आकर्षक कॅमेरा आहे, जो आपल्याला स्वस्तात मिळत आहे. ह्या कॅमे-यामध्ये आपल्याला ते सर्व फीचर मिळतील, जे एका प्रोफेशनल कॅमेरामध्ये असतात. ह्याच्या झूममुळे तुम्ही अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तूचे फोटो अगदी सहजपणे घेऊ शकतात, मग ती वस्तू तुमच्यापासून कितीही लांब का असेना.
कॅनन पॉवरशॉट SX60HS
हासुद्धा सर्वोत्कृष्ट कॅमे-याच्या यादीत येणारा कॅमेरा आहे. जो सर्वांपेक्षा वेगळा आहे, असे म्हणता येणार नाही, पण हा इतरांपेक्षा कमी सुद्धा नाही. हा कॅमेरासुद्धा आपल्यात एक खास असा कॅमेरा आहे.
येथे पाहा टॉप १० DSLR कॅमेरे-