दिवाळी सण आलाय, त्यामुळे तुमच्यापैकी अनेकजण फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी आपल्या मोबाईलची बॅटरी चार्ज करुन ठेवण्याच्या मागे आहेत. तुम्हाला जास्त करुन कमी प्रकाशात फोटो काढणे आवडते आणि त्यासाठी अनेक स्मार्टफोन्सचा संघर्ष चालू असतो. तथापि, तुम्ही उत्कृष्ट कॅमे-यासाठी चांगल्या स्मार्टफोन्सच्या शोधात असाल, तर आम्ही तुम्हाला पुढे दिलेल्या स्मार्टफोन्सचा पर्याय म्हणून तुम्ही निश्चित विचार करु शकता.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 5
हा सध्या बाजारातील सर्वोत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. कमी प्रकाशात ह्यात खूप चांगले फोटोज येतात आणि फोटोवरती क्रिया होण्यासाठी आणि कमीत कमी फोकसिंग वेळ मिळण्यासाठी त्याचे शटर तुम्हाला प्रतिसाद देणे चालू ठेवते.
LG G4
निश्चितच हा मार्केटमधील एक सर्वोत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. LG G4 तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रकाशात रंगाची पुर्ननिर्मिती करण्यास मदत करतो. हा इमेज शुट करण्यास आणि फोकस करण्यास मिलिसेकंदपेक्षा कमी वेळ घेतो.
सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लस
जर तुम्हाला स्टाइल आणि कॅमेरा ह्या दोघांचे मिश्रण हवे असेल, तर हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.
नोट: गॅलेक्सी S6 आणि S6 एज हे सुद्धा कॅमे-याच्या बाबतीत उत्कृष्ट स्मार्टफोन्स आहेत.
अॅप्पल आयफोन 6S
अॅप्पलने ह्यावर्षी आयफोन कॅमेरा 12MP करुन अत्यंत महत्त्वाचे असे पाऊल टाकले आहे. जरी हा नोट 5 शी मिळताजुळता नसला तरी अजूनही आयफोन कॅमे-याच्या बाबतीत इतर फोन्सपेक्षा वेगळा आहे.
हुआवे नेक्सास 6P
गुगलने अखेरीस त्याच्या नेक्सास स्मार्टफोनसाठी अल्गोरिदम सुधारले असून ह्या यादीतील हा सर्वोत्कृष्ट कॅमेरा बनवला आहे. नेक्सास 6P हा थोडा गतिशील असून कमी प्रकाशात हा उत्कृष्ट काम करतो.
सोनी एक्सपिरिया Z5
सोनी एक्सपिरिया Z5 चा कॅमेरा अजूनही इमेजवर क्रिया करण्यासाठी खूप वेळ घेतो मात्र त्याच्या फोटोचा दर्जा अजूनही तितकाच चांगला आहे.
ऑनर 7
ऑनर 7 हा सध्या बाजारात मध्यम श्रेणीतील फ्लॅगशिप फोन आहे आणि त्याचा कॅमेरा हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे.
वनप्लस 2
वनप्लसने त्याच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या कॅमे-याच्या गुणवत्तेत सुधारणा करुन लेसर ऑटोफोकस सिस्टम बनवून हा वनप्लस 2 चा कॅमेरा बनवला आहे. हा फोन LG G4 स्मार्टफोनपेक्षा जलद गतीने फोकस करत नाही. मात्र किंमतीच्या तुलनेत हा थोडा चांगला आहे.
ऑनर 6 प्लस
ऑनर 6 प्लसमध्ये असलेला ८ मेगापिक्सेल कॅमेरा हा कमी प्रकाशात चांगले फोटोज काढतो.
लिनोवो वाइब शॉट
लिनोवोच्या नवीन स्मार्टफोनमध्ये त्याचा कॅमेरा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही लवकरच त्याचा रिव्ह्यू पाहाल, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, त्याचा कॅमेरा ही त्यातील सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
झिओमी Mi 4
किंमतीच्या बाबतीत हा खाली येत असला तरी, झिओमी Mi 4 हा अजूनही सर्वांमध्ये उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे.
वनप्लस वन/वनप्लस X
नवीनच लाँच झालेला वनप्लस x स्मार्टफोनचा कॅमेरा चांगला आणि गतिशीलसुद्धा आहे.
ZTE नूबिया Z9 मिनी
२० हजारात येणारा हा ZTE नूबिया Z9 मिनी हा उत्कृष्ट फोटोज काढतो, पण ते काढण्यासाठी बराच वेळ घेतो. पण जर तुम्ही चांगला कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर, हा नक्कीच एक चांगला पर्याय आहे.
मिजू MX5
मिजू MX5 चा कॅमेरा हा मध्यम श्रेणीतील येणा-या फ्लॅगशिप फोनमधील उत्कृष्ट कॅमेरा आहे. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांमुळे हा थोडा झाकला जातो, मात्र हा अजूनही कॅमे-यासाठी उत्तम पर्याय आहे.