जर आपण सेल्फीप्रेमी असाल आणि आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा चांगला नसेल तर? विचारही करु शकत नाही, नाही का? कारण आजकाल प्रत्येकाला सेल्फी किंवा फोटो काढणे खूप आवडीचे आणि पसंतीचे काम झाले आहे. सोशल मिडियाशी जोडलेले राहण्यासाठी फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअॅप वर आपले स्टेटस आणि डिपी बदलण्यासाठी आपण नेहमीच आपल्या नवीन फोटोच्या शोधात असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सविषयी सांगणार आहोत, जे ५००० रुपयाच्या किंमतीत मिळत असूनसुद्धा ते उत्कृष्ट कॅमे-यासह येतात. चला चर मग माहित करुन घेऊयात, कोणते आहेत हे स्मार्टफोन्स...
इंटेक्स अॅक्वा फिश
ह्यात 5 इंचाची HD TFT डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्या लेटेस्ट सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 आधारित ह्या फोनमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा ड्यूल-सिम सपोर्ट येतो.
कार्बन टायटेनियम S205
ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेवर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षण आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशवाला ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 3.2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा स्मार्टफोन 2200mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
इंटेक्स क्लाउड ज्वेल
ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280x720 पिक्सेल आहे. ह्या फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्या फोनमध्ये क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे,ह्याचे स्टोरेज 32GB च्या मायक्रोएसडी कार्डने वाढवू शकतो. त्याशिवाय फोनमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कार्बन टायटेनियम मॅक 5
कार्बन टायटेनियम मॅक ५ ला LED फ्लॅश असलेला ८मेगापिक्सेल रियर शुटर कॅमेरा आणि सेल्फीप्रेमींसाठी BSI सेन्सर फलॅश असलेला ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हया फोनला १६ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. आणि जी ३२ जीबीपर्यंत एक्सटर्नल मेमरी कार्डद्वारा वाढवता येऊ शकते. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, कार्बन टायटेनियम मॅक ५ ला ५ इंचाचा एचडी डिस्प्ले असून १२८०x७२० रिझोल्युशन आणि कपॅसिटीव्ह टच आहे. हया फोनमध्ये २२०० mAh बॅटरी आहे. हयाची जाडी ८.७mm ची असून त्याचे वजन जवळपास १५९ ग्रॅम्स आहे.
गुड वन Z7
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन क्वाड-कोर प्रोसेसरसह येतो. ह्यात 2GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्यात 8MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 वर चालतो.
स्वाइप व्हर्च्यू
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, जी 1280x720 पिक्सेलसह येते. हा स्मार्टफोन 1.3Ghz क्वाड-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB रॅम आणि 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह दिला गेला आहे. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात 8MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो.