गूगल पिक्सल सीरीज
गूगल ने आपल्या पिक्सेल सीरीज मध्ये लॉन्च केलेले स्मार्टफोन्स एंड्राइड वन प्लॅटफार्म वर लॉन्च केले आहेत. या सीरीज मध्ये आता पर्यंत काही स्मार्टफोन्स आले आहेत. पण या सर्व स्मार्टफोन्स मध्ये एंड्राइड वन क्षमता आहे, पण याव्यतिरिक्त पण काही अशे स्मार्टफोन्स आहेत ज्यांची चर्चा पुढे करण्यात आली आहे.
Infinix Note 5
Infinix Note 5 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.99-इंचाचा FHD+ 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला फुल व्यू डिस्प्ले मिळत आहे, तसेच हा एका 2.5D कर्व्ड ग्लास स्क्रीन सह येतो. फोन मध्ये जो डिस्प्ले आहे, तो 1080x2160 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. या डिवाइस मध्ये एक यूनीबॉडी डिजाईन आहे, जी टेम्पर्ड एजेस सह येते, तसेच यात तुम्हाला प्रीमियम ग्लास फिनिश मिळेल.
फोन मध्ये एक 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा f/2.0 अपर्चर आणि 1.25µm पिक्सल सह येतो, फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल LED फ्लॅश मिळत आहे. या कॅमेर्यात तुम्हाला ऑटो सीन डिटेक्शन, AI पोर्ट्रेट, HDR, Beauty, Professional, Night, Panorama, Time-Lapse इत्यादि फीचर्स मिळतील. तसेच फोन मध्ये एक 16-मेगापिक्सलचा लो लाइट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये एक 4500mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जी कंपनी नुसार, 3 दिवस चालू शकते. या बॅटरी मध्ये 18W वाला Xcharge चा चार्जिंग सपोर्ट आहे.
Xiaomi Mi A1
स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये 5.5-इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2.5D कर्व्ड ग्लास सह येतो. यात रियर पॅनल वर एक फिंगर प्रिंट सेंसर पण आहे. Xiaomi Mi A1 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4GB चा रॅम आहे. तसेच यात 64GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.
Xiaomi Mi A1 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा 12MP चे आहेत. एक टेलीफोटो लेंस आहे आणि दुसरी वाइड-एंगल लेंस आहे. तसेच या फोन सोबत अनलिमिटेड फोटो स्टोरेज चा ऑप्शन पण मिळत आहे. या डिवाइस मध्ये 3080mAh ची बॅटरी आहे आणि एंड्राइड 7.1.2 नौगट वर चालतो.
काही दिवसांपूर्वी समोर आले होते की या डिवाइसला एंड्राइड Oreo चा सपोर्ट मिळाला आहे. शाओमी इंडिया ने याआधी एका ट्वीट मधून याची घोषणा केली होती की पेंडिंग अपडेट्स जारी करण्यात आले आहेत. या अपडेट ची साइज 1GB पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ असा की हा मोठा डाउनलोड आहे. हा अपडेट डिसेंबर सिक्योरिटी अपडेट्स सह येतो. आम्हाला अजून पर्यंत याची माहिती मिळाली नाही की या अपडेट मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे की नाही, कारण याआधीच्या बीटा बिल्ड मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट होता.
Xiaomi Mi A2
Xiaomi Mi A2 बद्दल बोलायचे झाले तर हा 5.99-इंचाच्या एका FHD+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 सह आला आहे. फोन मध्ये 4GB च्या रॅम सोबत 64GB ची स्टोरेज देण्यात आली आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने वाढवू शकता. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा मिळत आहे, तसेच फ्रंटला पण तुम्हाला एक 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोन स्टॉक एंड्राइड 8.1 Oreo वर लॉन्च करण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी क्विक चार्ज 4+ च्या सपोर्ट सह येते.
Nokia 7 Plus
Nokia 7 Plus स्मार्टफोन बद्दल चर्चा करायची झाल्यास हा स्मार्टफोन भारतात एका 6-इंचाच्या 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन पण 6000 सीरीज च्या एल्युमीनियम ने बनवण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट मिळत आहे. हा स्मार्टफोन कार्ल झिस लेंस सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच कंपनी ने हा स्मार्टफोन लॉन्च करताना असा दावा केला आहे की नोकियाचा हा स्मार्टफोन 2 दिवसांची बॅटरी लाइफ देईल. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक कॉपर आणि वाइट कॉपर रंगात विकत घेऊ शकता.
Nokia 6.1 Plus
Nokia 6.1 Plus मध्ये एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 5.8 इंचाचा FHD+ (2280x1080) डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि हा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ऑफर करतो. डिवाइसेज च्या फ्रंट aani बॅक ला गोरिला ग्लास 3 देण्यात आली आहे आणि हा ग्लोस मिडनाईट ब्लू, ग्लोस ब्लॅक आणि ग्लोस वाइट कलर मध्ये उपलब्ध होईल.
Nokia 6.1 Plus मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येते. Nokia 6.1 Plus पण एंड्राइड वन डिवाइस आहे याचा अर्थ असा की डिवाइस ला वेळच्या वेळी सिक्योरिटी अपडेट्स मिळतील आणि भविष्यात डिवाइस एंड्राइड 9 पाई वर पण अपडेट केला जाईल. Nokia 6.1 Plus आणि 5.1 Plus दोन्ही गूगल लेंस सह येतील.
Nokia 6.1
याच्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला 5.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळत आहे, हा FHD रेजोल्यूशन 1920x1080 पिक्सल सह लॉन्च करण्यात आला आहे, हा एका 16:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह लॉन्च करण्यात आला आहे.
सध्या लॉन्च झालेल्या काही स्मार्टफोंस मध्ये 18:9 आस्पेक्ट रेश्यो चा डिस्प्ले दिसला आहे, पण तरीसुद्धा या ट्रेंड ला नोकिया ने आपल्या नवीन फोन मध्ये सामील केले नाही. डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 मोबाईल प्लॅटफार्म देण्यात आला आहे, हा एका मोठय़ा बदल म्हणू शकतो, याआधी लॉन्च केलेला डिवाइस स्नॅपड्रॅगन 430 सह लॉन्च केला गेला होता.
Nokia 8 Sirocco
तसेच Nokia 8 Sirocco स्मार्टफोन बद्दल चर्चा करायची झाल्यास हा स्मार्टफोन स्टेनलेस स्टील सह लॉन्च करण्यात आला आहे, सोबतच यात तुम्हाला एक 5.5-इंचाचा एक P-OLED डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोन खुप थिन आहे. कंपनी ने हा फक्त 7.5mm थिन बनवाला आहे. स्मार्टफोन ला IP रेटिंग पण मिळाली आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन वाटर आणि डस्ट रेसिस्टेंट बनतो. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये वायरलेस चार्जिंग पण देण्यात आली आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला AOP Mic पण देण्यात आला आहे.
इथे या यादीत आम्ही अशा काही एंड्राइड स्मार्टफोन्स चा समावेश केला आहे, जे या एंड्राइड वन प्लॅटफॉर्म्स वरील फोन्सना चांगलीच टक्कर देऊ शकतात. आज आम्ही या स्मार्टफोन्स बद्दल जाणून घेणार आहोत. असे पण होऊ शकते की किंमत आणि स्पेक्स च्या बाबतीत हे एंड्राइड स्मार्टफोन्स थोडे मागे राहतील पण सध्या हे अफोर्डेबल किंमतीत पण खुप प्रसिद्ध आहेत. चला एक नजर या स्मार्टफोन्स वर पण टाकू.
Xiaomi Redmi Note 5 Pro
डिवाइस चे स्पेक्स पाहता Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर मिळेल. यात 6GB चा रॅम पण आहे.
या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा सोबत LED लाइट पण देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण देण्यात आला आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबतच या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पण आहे. यात 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Asus Zenfone Max Pro M1
या स्मार्टफोन च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 10,999 रूपये आहे, तर डिवाइस च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 12,999 रूपये आहे. या डिवाइस मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180x1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.
Honor 9 Lite
Honor 9 Lite मध्ये 5.65 इंचाचा 18:9 वाला डिस्प्ले आहे जो फुल HD+ रेजोल्यूशन सह येतो. या डिवाइस च्या दोन्ही बाजूला डुअल कॅमेरा सेटअप आहे आणि हा डिवाइस लेटेस्ट इमोशन UI वर चालतो जो एंड्राइड ओरियो वर आधारित आहे. Honor 9 Lite डिवाइस मध्ये किरिन 659 चिपसेट आहे जो ओक्टा-कोर CPU सह येतो आणि हा 2.36 GHz वर क्लोक्ड आहे. या वेरिएंट मध्ये 3 GB आणि 32 GB स्टोरेज आहे याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने 256 GB पर्यंत वाढवता येते. या डिवाइस च्या फ्रंट आणि बॅक ला 13 MP + 2 MP चा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि दोन्ही कॅमेरा 1080p वीडियो रिकॉर्ड करू शकतात. Honor 9 Lite मध्ये 3,000 mAh ची ली-पॉलीमर बॅटरी आहे जी सुपर चार्ज ला सपोर्ट करते.