सध्या स्मार्टफोन्सवरील सेल्फी ह्या प्रकाराचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले बघून लोकांचे फोटोग्राफीचे वेड पाहता अनेक मोबाईल्स कंपन्या आपल्या स्मार्टफोन्समध्ये उत्कृष्ट कॅमेरा वैशिष्ट्ये देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण कधी कधी कमी किंमतीच्या स्मार्टफोन्समध्ये किंवा उत्कृष्ट कॅमेरा फिचर नसलेल्या स्मार्टफोन्समध्ये चांगले फोटो न आल्यामुळे फोटोवेडे असलेल्यांचा अनेकदा हिरमोड होतो. पण ह्यावर तोडगा म्हणून गुगल प्ले स्टोअरवर असे काही अॅप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोटोवर उत्कृष्ट इफेक्ट देऊ शकता, त्याची गुणवत्ता बदलू शकतो इतकेच नव्हे फोटो एडिटिंग त्याचा बॅकग्राउंडही बदलू शकता. चला तर मग पाहूयात, फोटो एडिटिंगसाठी प्ले स्टोअवर असलेले उत्कृष्ट अॅप्स....
PIP Camera - Photo Editor Pro
तुम्ही काढलेल्या सेल्फीजसाठी ह्यात उत्कृष्ट फोटो फ्रेम्स देण्यात आले आहेत. तुमचे फोटो थोडे मनोरंजक आणि क्रिएटिव्ह बनविण्यासाठी PIP Camera अॅपचा वापर करतात. पिप कॅमेरा तुमचा फोटो दुस-या एखाद्या क्रिएटिव्ह फ्रेममध्ये सेट करतो. त्यात तुम्हाला फ्रेमचे वेगवेगळे आकार आणि स्टाइल पाहायला मिळतात, ज्यात ग्लास, हात, कॅमेरा, लॉकेट्स इ. अनेक थीम्सचा समावेश करण्यात आला आहे.
Photo Collage - InstaMag
फोटो कोलाजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स देण्यात आल्या आहेत ज्याच्या मदतीन तुम्ही तुमच्या फोटोला विशिष्ट फ्रेममध्ये टाकून त्याची एक सुंदर फ्रेम बनवून घरात लावू शकता, फोटो कोलाज - InstaMag हा एक सर्वात लोकप्रिय असा फोटो ग्रीड आणि फोटो एडिटर आहे, जो खूप सा-या इफेक्ट्स आणि फिल्टर्ससह येतो. तसेच ह्यात खूप सारे इफेट्स, स्टिकर्स आणि फीचर्स आहेत जे तुम्ही तुमच्या फोटोंवर वापरू शकता.
Love Collage - Love Editor
लव कोलाज हा एक असा लव फोटो एडिटर अॅप आहे, जो तुमच्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तींची विशेष फोटोंच्या माध्यमातून कायम तुमच्यासाठी जोडलेले ठेवतो. तुमच्या प्रेमाला, त्या गोड आठवणींना सुंदर कोलाजामध्ये साठवून ठेवतो. ह्यात अनेक फोटोफ्रेम्स, कोलाज, फोटो ग्रीड्स,इफेट्स, स्टीकर्स, इमोशन्स आणि क्लिपआर्ट्स देण्यात आल्या आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला एक खास सरप्राइजसुद्धा देऊ शकता.
Picture Grid Builder
पिक्चर ग्रीड बिल्डर मध्ये १५ वेगवेगळ्या बॅकग्राउंड टेक्चर्ससह, ९० वेगवेगळे स्टाइल्सचे फोटोजे जोडू शकतो. तसेच ह्यात असे काही स्टीकर्स देण्यात आले आहेत ज्यात तुम्ही मजकूरही लिहू शकता किंवा त्यावर काही रेखाटूही शकता. ह्यात ४०० पेक्षा जास्त वेगेवगळ्या विभागातील स्टीकर्सचा समावेश करण्यात आला आहे.
You Makeup - Makeover Editor
तुमच्या फोटोवर उत्कृष्ट मेकअप इफेक्ट्स देण्यासाठी आणि त्यात तुमचा चेहरा अजून सुंदर
दिसण्यासाठी ‘यू मेकअप’ हा एक उत्कृष्ट अॅप आहे. ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे डोळे, ब्लशेस, भुवया आणि लिपस्टिक्स मिळतील, जे तुमचे सौंर्द्य खुलवण्यासाठी मदत करतात.