महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Mar 01 2016
महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी आणि महिलांवर होणारे अत्याचार ह्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवनवीन उपाय, योजना राबविण्यास प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक स्त्रीने प्रसंगावधान दाखवून अशा बिकट परिस्थितीत गोंधळून न जाता येणा-या संकटाला धैर्याने आणि बुद्धिचातुर्याने सामोरे जाण्यासाठी आम्ही आज तमाम महिला वर्गासाठी असे ५ महत्त्वाचे अॅप्स सांगणार आहोत, जे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

Women safe circle

ह्या अॅपच्या साहाय्याने तुम्ही केवळ एक क्लिकवर तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांशी जोडलेले राहता. जर तुम्ही संकटात असाल तर ह्या अॅपच्या साहाय्याने तुमच्या जवळच्या लोकांना SMS अलर्ट किंवा टेक्स्ट मेसेज पाठवला जातो. तसेच GPS च्या माध्यमातून तुमच्या जवळच्या लोकांना तुमचे ठिकाणही समजते.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

Fightback

महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा एक उत्कृष्ट अॅप आहे. हा मोठ्या प्रमाणातील डिवायसेसशिवाय फीचर फोन्समध्येही कार्यरत आहे. GPS, GPRS, SMS,emails आणि Facebook च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आप्तलगांना तसेच मित्रपरिवाराची मदत घेऊ शकता. त्याला एक ‘Panic’ बटन आहे, जे दाबल्यावर पोर्टल पेज येते, जे तुम्ही संकटात असल्याचे किंवा तुम्हाला मदतीची गरज असल्याचे फेसबुकवर अपडेट देते. त्यात गुगल मॅपच्या द्वारे तुमचे ठिकाणही सांगितले जाते. तसेच तातडीचा असा टेक्स्ट मेसेज तुमच्या प्रियजनांपर्यंत ह्या अॅपच्या माध्यमातून पाठविला जातो.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

Safetipin

जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन किंवा अनोळखी अशा ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा हा अॅप खूपच फायदेशीर आहे. सेफ्टीपिनच्या माध्यमातून यूजरला त्या असलेल्या ठिकाणाच्या सुरक्षेसंबंधी माहिती दिली जाते. हा अॅप यूजरला सेफ्टी स्कोअर, कमेंट्स तसेच फोटोही पाठवतो. जेव्हा तो/ती एखाद्या अनोळखी ठिकाणी जात असेल, तेव्हा हा अॅप प्राथमिक सुरक्षा घेण्यासाठी खूप मदत करतो.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

Eyewatch Police

हा अॅप वापरण्यासाठी खूपच सोपा आहे. ज्या महिला संकटात आहेत अशांसाठी हा अॅपच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवले जाते. एकदा हा अॅप डाऊनलोड होऊन तुमच्या स्मार्टफोनवर इन्सटॉल झाला की, जे संकटात असतील, त्यांनी ठराविक बटन दाबून पोलीस नियंत्रण कक्षाला SOS पाठवावा. त्यामुळे पोलीससुद्धा त्याच्या/तिच्या फोन कॅमे-याच्या माध्यमातून यूजरचे ठिकाणाचा व्हिडियो पाहू शकता.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

Guardian

विंडोजने अजून एक सुरक्षा अॅप आणला आहे ज्याचे नाव आहे गार्डियन. ज्याच्या माध्यमातून यूजर त्याचे डिवाइस ट्रॅक करु शकतात. हा अॅप भारतासाठी बनविला आहे. हा अॅप तुम्हाला महिला तसेच त्यांच्या ठराविक समूहाला सुरक्षेची हमी देतो. हा दोघांना जोडण्यासाठी जलद गतीने ट्रॅक केला जातो आणि तुम्हाला पोलीस, हॉस्पीटल्स आणि अशा अनेक लोकल एजन्सीजला तुमच्या फोनवरुन दिशा-निर्देश देतो. तसेच सुरक्षेसंबंधी काही महत्त्वांच्या सूचनांचे एसएमएस अलर्टसुद्धा देतो. थोडक्यात सांगायचे झाले तर हा, अॅप एखाद्या पालकांप्रमाणे महिलांची काळजी घेतो.