ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर आजपासून मेगा मोबाईल सेल सुरु झाला आहे. हा सेल २८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत चालेल. ह्या सेलच्या अंतर्गत काही कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट मिळत आहे. त्यामुळे तुमचे ह्या सेलमधील मोबाईल निवडण्याचे काम आणखी सोपे करण्यासाठी आम्ही तुम्हाला ह्या सेलमधील अशा उत्कृष्ट ऑफर्स सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. तसेच सिटी बँक कार्ड होल्डर्स 10 टक्क्यांपर्यंतचा कॅश बॅक ऑफरसुद्धा मिळत आहे.
1. इंटेक्स क्लाउड क्रिस्टल 2.5D
ह्या सेलच्या अंतर्गत ६,८९९ किंमतीचा इंटेक्स क्लाउड क्रिस्टल 2.5D स्मार्टफोन ६,६९९ रुपयात मिळत आहे. ह्या फोनमध्ये 3GB रॅमसुद्धा मिळत आहे.
२. मायक्रोमॅक्स कॅनवास व्ह्यू 2
मेगा मोबाईल सेलच्या अंतर्गत मायक्रोमॅक्स कॅनवास व्ह्यू 2 स्मार्टफोनला ६,४९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. ह्या फोनला १२,४९९ रुपयात सादर केले होते.
3. मोटोरोला मोटो G टर्बो एडिशन
मोटोरोलाच्या मोटो G टर्बो एडिशन स्मार्टफोनचे 16GB व्हर्जन सेलच्या अंतर्गत ११,४९९ रुपयात मिळत आहे.
4. गूगल हुआवे नेक्सस 6P
ह्या सेलमध्ये नेक्सस 6P चे 32GB व्हर्जन ३४,९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध आहे. तर 64GB चे व्हर्जन ३९,४९९ रुपये आहे.
5. वनप्लस X
ह्या फोनचे ऑनिक्स व्हर्जन अॅमेझॉन इंडियावर कोणत्याही निमंत्रणाशिवाय १४,९९९ रुपयात उपलब्ध आहे.
6. सॅमसंग गॅलेक्सी E5
ह्या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी E5 स्मार्टफोन सफेद रंगात १०,४९९ रुपयात उपलब्ध आहे. तर काळ्या रंगातील स्मार्टफोन १२,२०० रुपये आणि ब्राउन वेरियंट १५,४०० रुपयात खरेदी केला जाऊ शकतो.
7. कूलपॅड नोट 3
ह्या सेलमध्ये कूलपॅड नोट 3 स्मार्टफोन ८,४९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे. ह्या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात 3GB रॅम आणि फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा आहे.
8. मोटोरोला मोटो G थर्ड जेनरेशन
मोटो G थर्ड जेनचा 16GB व्हर्जन ह्या सेलअंतर्गत १००० रुपयाच्या डिस्काउंटसह ९,९९९ रुपयात मिळत आहे.
9. मिजू M2 नोट
हा स्मार्टफोन ह्या सेलमध्ये ८,९९९ रुपयात खरेदी करु शकता. ह्या फोनवर १,००० रुपयाचे डिस्काउंट मिळत आहे.
10. इंटेक्स क्लाउड क्यूब
हा स्मार्टफोन मेगा मोबाईल सेलमध्ये ३,१९९ रुपयात मिळत आहे. ह्या फोनला ४,२९० रुपयात सादर केले होते.