मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीला भारतात जवळपास २ वर्ष झाले. आजपासून जवळपास २ वर्षे आधी शाओमीने भारतात दमदार प्रवेश केला होता. तसे पाहायला गेले तर भारतात येण्याआधी कंपनीने पहिले तीन फोन्सनी चीनच्या बाजारात चांगला धंदा केला होता. चला तर मग नजर टाकूयात, शाओमीच्या ह्या फ्लॅगशिप फोन्सवर....
शाओमी Mi 1
शाओमी Mi 1 स्मार्टफोन भारतात आलेला कंपनीचा फोन होता. आता जर आपण ह्या फोनला पाहिले तर, आपल्याला विश्वास बसणार नाही, की हा फोन एकेकाळी शाओमीचा फ्लॅगशिप फोन होता.
येथे शाओमी Mi 1S स्मार्टफोनची वैशिष्ट्ये दिली आहेत.
डिस्प्ले: ४ इंच, 480p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन S3
रॅम: 1GB
स्टोरेज: 4GB
कॅमेरा: 8MP, 2MP
बॅटरी: 1930mAh
ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉइड 4.0
शाओमी Mi 2
शाओमी Mi 2 कंपनीचा दुसरा फोन होता. ह्याला नोव्हेंबर 2012 मध्ये सादर केले गेले होते. ह्यात आपल्या पहिल्या व्हर्जनच्या तुलनेत जास्त चांगले फीचर्स दिले गेले आहेत. ह्याची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे ह्याची डिस्प्ले. ह्यालासुद्धा चीनमध्ये सादर केले गेले होते. ह्याला अॅनड्रॉईड जेली बीनसह लाँच केले गेले होते. ह्या फोनचे आणखी दोन प्रकार शाओमी Mi 2S आणि शाओमी Mi 2A सुद्धा लाँच केले गेले होते. शाओमी Mi 2 पहिला असा डिवाइस होता जो स्नॅपड्रॅगन 600 सह लाँच झाला होता.
शाओमी Mi 2 स्मार्टफोनचे फीचर्स येथे दिले आहेत.
डिस्प्ले: ४.३ इंच, 720p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 600
रॅम: 2GB
स्टोरेज: 16/32GB
कॅमेरा: 8MP, 2MP
बॅटरी: 2000mAh
ओपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 4.4.4
शाओमी Mi 3
शाओमी Mi 3 कंपनीचा पहिला फोन होता, ज्याला भारतात लाँच केले गेले होते. ह्या फोनला कमी किंमतीत लाँच केले गेले होते, मात्र ह्यात फ्लॅगशिप फोनचे फीचर्स दिले गेले होते.
येथे शाओमी Mi 3 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये दिली आहेत
डिस्प्ले: 5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 800
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 2MP
बॅटरी: 3050mAh
ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 4.4.2
शाओमी Mi 4
शाओमी Mi 4 एक उत्कृष्ट स्मार्टफोन होता. हा थोडाफार Mi 3 सारखाच होता. ह्या फोनला २०,००० रुपयाच्या किंमतीत सादर केले गेले होते. मात्र त्यानंतर ह्याची किंमत १५,००० पर्यंत आली होती.
येथे शाओमी Mi 4 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये दिली आहेत
डिस्प्ले: 5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801
रॅम: 3GB
स्टोरेज: 16/64GB
कॅमेरा: 13MP, 8MP
बॅटरी: 3080mAh
ऑपरेटिंग सिस्टम: 4.4.3 (लाँचवेळी)
शाओमी Mi 5
शाओमी Mi 5 स्मार्टफोन कंपनीचा सर्वात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ह्यात खूपच चांगले फीचर्स दिले गेले आहेत. भारतात स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह येणारा पहिला फोन आहे.
डिस्प्ले: 5.15 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 16MP, 4MP (अल्ट्रापिक्सेल)
बॅटरी: 3000mAh
ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉइड 6.0
शाओमी Mi नोट प्रो/ Mi नोट
शाओमी Mi नोट प्रो आणि Mi नोटला कंपनीने केवळ चीनमध्ये लाँच केले आहे. मात्र हा खूपच उत्कृष्ट डिवाइस आहे. हा पहिला फोन आहे, ज्याला कर्व्ह्ड बॅक डिझाईनसह लाँच केले गेले होते. आता हे डिझाईन सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि शाओमी Mi 5 सह सुद्धा पाहिले जाऊ शकते.