मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

ने Team Digit | अपडेट Mar 11 2016
मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

जर गेम्सचे चाहते असाल आणि नवीन लाँच झालेल्या आणि होणा-या गेम्ससाठी थोडे पैसे करण्याची तुमची तयारी असेल, तर आम्ही तुम्हाला आज उत्कृष्ट गेम्सची यादी देणार आहोत. येथे मार्च २०१६ म्हणजे ह्या महिन्यात लाँच झालेल्या आणि होणा-या ८ उत्कृष्ट गेम्सची यादी दिली आहे आणि हे गेम्स खरोखरच तुम्ही त्यासाठी खर्च केलेल्या पैशाचे चीज करतील.

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

Screencheat

ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये PS4 आणि Xbox One साठी १ मार्चला स्क्रीनचिट गेम लाँच करणार असल्याचे सांगितले होते. ह्या गेमची सर्वात खास गोष्ट म्हणजे स्क्रीनचिटमध्ये तुम्हाला तुमचे विरोधक दिसणार नाहीत. स्क्रीनचिटचे स्वत:चे १ ते ४ प्लेअर्स आणि ऑनलाइन २ ते ८ प्लेअर्स असतात. PS4 आणि XBox One वर PC साठी सर्व नवीन कटेंट विकसित केले आहे. ह्यात AI bots, ६ नवीन मॅप्स, दोन नवीन हत्यारे, नवीन मोड्स, टीम प्रकार, तुमचा गेम मोड्स निर्माण आणि सेव्ह करण्यासाठी कस्टमायझेशन पर्याय दिला आहे.   

रिलीज तारीख: १ मार्च

किंमत: ९४० रुपये

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

The Division

गेमर्सच्या मनात यूबीसॉफ्ट The Division विषयी अनेक शंका आहेत, पण हा गेम बिटावर खेळल्यानंतर तुम्हाला कळेल की, विकासकाने सांगितल्याप्रमाणे ह्या गेममध्ये सर्वकाही आहे. द डिव्हिजन हा ऑनलाइन खुला जागतिक गेम आहे,जेथे तिस-या व्यक्तीसाठी जो नेमबाजाची भूमिका करतोय, त्याला जगण्यासाठी काही ठराविक साधने दिली जातात.

रिलीज तारीख: ८ मार्च

किंमत: कन्सोलवर ३४९९ रुपये आणि PC वर १७९९ रुपये

प्लेटफॉर्म: प्लेस्टेशन 4, Xbox One, मायक्रोसॉफ्ट विंडोज

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

Hitman

ह्या गेमच्या निर्मात्यांनी हा गेम भागांमध्ये रिलीज करण्याचे ठरवले. कारण आतापर्यंत आपल्याला असे पाहायला मिळाले आहे की, गेमर्सला प्रत्येक टप्प्यात अनेक मिशन्स पार करावे लागतात आणि ते ही गोष्ट खूप एन्जॉय करतात. नवीन हिटमॅन गेमचा हा पहिला भाग आज रिलीज होणार आहे.

रिलीज तारीख: ११ मार्च

किंमत : PS4 आणि Xbox One साठी ३,९९९ रुपये

प्लेटफॉर्म: प्लेस्टेशन 4, Xbox One, मायक्रोसॉफ्ट विंडोज

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

EA Sports UFC 2

जर तुम्ही MMA अॅक्शन असणारा गेम शोधत असाल तर, EA Sport UFC 2 हा एक चांगला पर्याय आहे. प्रथमच खेळण्यासाठी हा गेम हाताळणे खूपच सोपे आहे आणि तुम्हाला त्यांच्या कोचकडून काही टिप्ससुद्धा दिल्या जातात. ह्या गेममध्य आपल्याला अनेक प्रकार पाहायला मिळतील जे गेमर्सने चांगले मनोरंजन करतील.

रिलीज तारीख: १५ मार्च

किंमत: ३,९९९ रुपये

प्लेटफॉर्म: PlayStation 4, Xbox One

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

Sebastien Loeb Rally EVO

जर तुम्हाला चिखलातील कार रेसिंग खेळायला आवडत असेल, तर हा गेम तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. Sebastien Loeb Rally EVO रस्त्याशिवाय इतर मार्गावर कार रेसिंग करणे हे ह्या गेमचे खास आकर्षण आहे. उत्कृष्ट ड्राइव करणे आणि जगातील अशा अनेक वेड्या वाकड्या वळण असलेल्या विचित्र रोडवर ड्रायव्हिंग करणे हे ह्या गेमचे मुख्य हेतू आहे.

रिलीज तारीख: मार्च २०१६

किंमत: PS4 आणि Xbox One साठी ३,७०० रुपये आणि PC साठी ८५० रुपये

प्लेटफॉर्म: PlayStation 4, Xbox One, मायक्रोसॉफ्ट विंडोज

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

MXGP 2

रेसिंगचा अजून एक पर्याय गेम पाहात असाल तर हा २ व्हिलर म्हणजेच बाइक रेसिंगसाठी MXGP 2 दिला आहे. हा गेम 2015 मोटोक्रॉस वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आधारित आहे.

रिलीज तारीख: ३१ मार्च

प्लेटफॉर्म: PS4, Xbox One and PC

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

Far Cry Primal

हा गेम PS4 आणि Xbox One वर फेब्रुवारी २०१६ मधील सर्वोत्कृष्ट गेम ठरला. पण PC हा १ मार्च २०१६ ला लाँच झाला. हा गेम अश्मयुगीन काळातील जीवनावर आधारित आहे, जेथे धनुष्यबाण, भाले आणि अशा अनेक शस्त्रांचा वापर केला आहे. तसेच ह्यात तुम्हाला प्राण्यांचा वापर करुनही हा गेम खेळता येईल.

रिलीज तारीख: १ मार्च

किंमत: १७९९ रुपये

प्लेटफॉर्म: PC

मार्च २०१६ मधील ८ उत्कृष्ट गेम्स

Killer Instinct Season 3
जेव्हा Killer Instinct Xbox One वर लाँच झाला तेव्हा यूजर्सला त्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपयोगी ठरले. पण आता त्यातील पात्र वाढवून हा नवीन गेम बनवला गेला. आता त्यात अजून वाढ करुन त्याच्या तिस-या भागात अनेक पात्र जोडली गेली. हा गेम Xbox One साठी ह्या महिन्यात लाँच होणार आहे.
रिलीज तारीख: मार्च २०१६
प्लेटफॉर्म: Xbox One