आज आम्ही अशा स्मार्टफोन्सविषयी माहिती देणार आहोत, जे स्मार्टफोन्स आधीपासूनच बाजारात उपलब्ध असून आकर्षक डिझाईन्स, कॅमेरा आणि इतर खास वैशिष्ट्यांमुळे हे स्मार्टफोन्स स्वत:तच खास आहे. ह्यातील काही फ्लॅगशिप डिवाइस सुद्धा आहेत, जे खरेच खूप उत्कृष्ट आहेत. चला तर मग माहित करुन घेऊयात ह्या स्मार्टफोन्सविषयी….
अॅप्पल आयफोन SE
अॅप्पलने हा दोन प्रकारात लाँच केला आहे ह्याच्या 16GB व्हर्जनची किंमत 399 डॉलर आणि 64GB व्हर्जनची किंमत 499 डॉलर ठरविण्यात आली आहे. हा नवीन आयफोन 31 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याला मे मध्ये १०० देशांमध्ये विकले जाईल. हा आयफोन SE ची भारतातील किंमत ३९,००० रुपये आहे.ह्यात आपल्याला A9 प्रोसेसर आणि M9 मोशनचे को-प्रोसेसर मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 12MP चा isight (रियर) कॅमेरा 4K व्हिडियो सपोर्ट मिळत आहे, त्याशिवाय आयफोन SE मध्ये 1.2MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात अॅप्पल सपोर्टसह एक फिंगरप्रिंट सेसरसुद्धा मिळत आहे.
शाओमी Mi 5
ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. शाओमी Mi 5 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.15 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कर्व्ह्ड 3D सेरामिक ग्लाससह येते. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 428ppi आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन 820 प्रोसेसर, एड्रेनो 530 GPU आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S7 एज
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये आपल्याला QHD डिस्प्ले मिळत आहे. गॅलेक्सी S7 ५.१ इंचाची QHD डिस्प्लेसह आणि S7 एज 5.5 इंचाच्या QHD कर्व्ह्ड एज डिस्प्लेसह लाँच झाला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एक्सीनोस 8890 प्रोसेसरसह ४जीबीची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर आपल्याला 32GB चे स्टोरेजसुद्धा दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. फोन्समध्ये मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचा ड्यूल पिक्सेल कॅमेरा f/1.7 अॅपर्चर लेन्ससह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा वाइड अँगल्ससह मिळत आहे.
मोटो X फोर्स
मोटो X फोर्स स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचाची QHD 1440x2560 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले “Shatterproof” आहे, जो तुटू शकत नाही. याचाच अर्थ की, ह्याची डिस्प्ले आपण कितीही उंचावरुन फेकली तरीही, ती तुटू शकत नाही. ह्या डिस्प्लेला अॅल्युमिनियम रिजिड कोर ने बनवले आहे. त्याचबरोबर फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेअर टचस्क्रीन पॅनलने बनलेली आहे. तसेच हा स्मार्टफोन वॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो.
ब्लॅकबेरी प्रिव
जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.4 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440x2560 पिक्सेल आहे. ह्यात 1.44GHz क्वालकॉम-हेक्साकोर स्नॅपड्रॅगन 808 चिपसेटसह दिला गेला आहे. हा 3GB रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्यात 18 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम लॉलीपॉप 5.1.1 वर चालतो. हा स्मार्टफोन 3410mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
LeEco Le मॅक्स
Le मॅक्स स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 6.33 इंचाची 2K डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 21 मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-यासह आणि 4 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आहे.