जर आपल्याला आकर्षक वैशिष्ट्ये असलेला आणि मेटल बॉडीने सुसज्ज असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. ह्या स्मार्टफोन्सची किंमत साधारण १०,००० पासून सुरु होते. चला तर मग जाणून घेऊयात, ह्या स्मार्टफोन्सविषयी ते ही ह्या स्लाइड्सच्या माध्यमातून..
यू यूटोपिया स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.२ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560x1440 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 565ppi आहे आणि हा 16M रंगांच्या सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन 2GHz A57 क्वाड-कोर सह 1.5GHz A53 क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आणि ४ जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-SD कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर ह्यात २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे, जो की LED फ्लॅशसह येतो. ह्यात ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप (Cyanogen OS 12.1) ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
लेनोवो वाइब P1
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
रॅम: 2GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 5000mAh
किंमत: १५,९९९ रुपये
लेनोवो वाइब P1M
प्रोसेसर : मीडियाटेक MT6735P
डिस्प्ले : 5 इंच, 1280x720 पिक्सेल
रॅम : 2GB
स्टोरेज : 16GB
कॅमेरा : 8MP, 5MP
बॅटरी : 4000mAh
किंमत : ७,९९९ रुपये
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.२ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले २.५ कर्व्ड टच पॅनलने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे प्रोटेक्शनसुद्धा दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz मिडियाटेक MT6753 प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. ग्राफिक्ससाठी ह्यात mali-T720 MP2 GPU सुद्धा आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह १३ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 2900mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिस्प्ले 178 डिग्री वाइड व्ह्यूविंग अँगल्स आणि 1080p रिझोल्युशनसह दिली गेली आहे. ह्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षणसुद्धा दिले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे आणि पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, Mali T 720-MP3 (up to 450MHz 3D graphics accelerator) GPU ला 3GB ऱॅमसह दिले गेले आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
सॅमसंग गॅलेक्सी A7
सॅमसंग गॅलेक्सी A7 (2016 एडिशन) च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉप दिला गेला आहे. ह्यात 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असेल. हा 1.6GHz ऑक्टा-कोर एक्सीनॉस 7 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याशिवाय ह्यात 2GB ची रॅमसुद्धा असू शकते. इतर स्पेसिफिकेशनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज, १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 4.7 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.