हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

ने Abhijit Dey | अपडेट Jan 15 2016
हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

बाजारात असंख्य अशा हायपर लोकल अॅप्सचा सध्या पूरच आला आहे. तसेच हे अॅप्स आपल्याला अनेक प्रकारच्या सेवासुद्धा प्रदान करत आहे. तुम्हाला तुमचे किराणामाल तुमच्या घरापर्यंत पोहोचलेले हवे असेल, तुमचा टीव्ही रिपेअर करुन हवा असेल, तसेच रिटेल आउटलेट्समध्ये तुम्हाला उत्कृष्ट डिल्स हव्या असतील, ह्या आणि अशा अनेक समस्यांचे निराकरण करणारे हे अॅप्स आहेत. ह्या असंख्य अॅप्समध्ये असे काही ठराविक अॅप्स आहेत, जे तुम्ही तुमच्या स्मार्टफोन्समध्ये ताबडतोब इन्स्टॉल केले पाहिजत, असे अॅप्स आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

Haptik

जर तुम्हाला तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यायचा असेल किंवा तुम्हाला रोजच्या लोकल सेवांविषयी माहिती करुन घ्यायची असेल किंवा काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्या असे वाटत असेल, तर तुम्ही Haptik अॅप वापरा. ह्याच्या माध्यमातून तुम्ही जेवण ऑर्डर करणे, फोन रिचार्ज करणे, प्रोडक्टसाठी उत्कृष्ट डिल्स मिळवणे, चित्रपटाचे तिकिट बुक करणे ही आणि यांसारखी अनेक कामे तुम्ही करु शकता. येथे तुम्हाला एक पर्सनल असिस्टंट त्याच्या नावासहित दिलेला असतो. तो वेळोवेळी तुम्हाला तुमच्या काही महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करुन देतो आणि वेळोवेळी त्यासंबंधींचा अलार्मही देतो.

हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

Zomato Order

जगातील उत्कृष्ट असे रेस्टॉरन्ट आणि फूड यांविषयी सविस्तर माहिती देणारा Zomato एक उत्कृष्ट माध्यम आहे आणि आता त्यांनी ह्या मोठ्या नेटवर्कचा आणि डेटाबेसचा फायदा करुन त्यांनी त्याची स्वत:ची फुड डिलिवरी सुरु केली आहे, ज्याला Zomato Order असे नाव दिले आहे. हा एक स्वतंत्र असा अॅप आहे, ज्यात तुम्हाला असंख्य असे रेस्टॉरन्ट पर्याय मिळतात. ह्याचे एक खास वैशिष्ट्य दिले आहे, ते म्हणजे समजा, जर तुम्हाला चिकनशी संबंधित एखादी डिश हवी असेल तर, तुम्हाला मेन्यूमधील सर्च आयटम्सवर चिकन असे टाइप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्वरित चिकनशी संबंधित असलेल्या अनेक डिश फोटोसह तुमच्या स्क्रीनवर येतील.

हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

UrbanClap

अनेकदा तुमचा टीव्ही किंवा वॉशिंग मशीन खराब होतो. अशावेळी तुम्ही त्या कंपनीतील एखाद्या व्यक्तीला रिपेअरिंगसाठी बोलवतात. आणि रिपेर करण्याची रक्कम ऐकून तुम्ही कधीकधी खाजगी रिपेअर सेवांचा वापर करता. UrbanClap हा केवळ तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्ट रिपेअर करणे एवढेच काम करत नाही, तर तुम्हाला ह्यात लग्नासाठी प्रोफेशनल फोटोग्राफर्स, गितार शिक्षक आणि चार्टर्ड अकाउंटट इत्यादींचीही माहिती देतो.

हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

Pluss

तुमची औषधेही आता तुमच्या दारापर्यंत घरपोच करण्याची सुविधा ह्या अॅप्सद्वारे तुम्हाला मिळते. वृद्ध तसे लहान मुलांसाठी हा उत्तम पर्याय आहे. केवळ काही टॅप्सच्या माध्यमातून तुम्ही काही महत्त्वाची औषधे त्याच्या तपशीलासह तुमच्या पालकांपर्यंत किंवा आजीआजोबांपर्यंत पोहोचवू शकता. Pluss तुमचे प्रिस्क्रिप्शन अपलोड करतो आणि तुम्हाला हवी असलेली औषधे ऑर्डर करतो. ह्या औषधांसह तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांची औषधे, दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टी तसेच बेबी केअर प्रोडक्ट्स यांसारखी गोष्टीही ऑर्डर करु शकता. तसेच मलेरिया, किडनी स्टोन, अॅनेमिया यांसाऱख्या आजारांसाठी असणारे लॅब सेंटर्सची यादीही देतो. पण ही सेवा सध्या दिल्लीत सुरु झाली आहे, इतर शहरांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यासाठी थोडा वेळ जाईल. पण ही खूप महत्त्वपुर्ण अशी सेवा असल्याचे दिसत आहे.

हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

Grofers

तुमचे किराणामाल तुमच्या घरापर्यंत पोहोचवणे हे, ह्या अॅपचे मुख्य काम आहे. त्याशिवाय सौंदर्यप्रसाधने, केक्स, बेबी फूड, गोठवलेले अन्न इत्यादी अनेक गोष्टी हा तुमच्या पर्यंत पोहोचवतो. मात्र  कधीकधी रात्री साडे आठनंतर ही सेवा पुर्णपणे बंद करतात. त्यामुळे डिलिवरीच्या बाबतीत कदाचित हे जास्त फ्लेक्सिबल असू शकत नाही. पण तरीही ह्याचे कॅटलॉग खूप मोठे आहे आणि तुमच्या स्वत:पुरता पुरेसे आहे. तसेच तुम्हाला कोणत्याही अन्नपदार्थांसाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही.

हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

Little

जेव्हा आपण हायपरलोकल अॅप्सविषयी बोलतो, तेव्हा आपण लोकल रिटेल स्टोअर्समधून शॉपिंग करणे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करु शकत नाही. मात्र असे अनेक अॅप्स आहेत, जे ही सेवा तुमच्या जवळच्या स्टोअर्समध्येही उपलब्ध करुन देतात आणि त्यावर उत्कृष्ट डिस्काउंटसुद्धा देतात. पण तरीही Little अॅप हा उत्कृष्टरित्या काम करतो आणि तुम्हाला असंख्य अशा रिटेल स्टोअर्सची यादी तसेच रेस्टॉरन्ट, चित्रपट, हॉटेल्स आणि फिटनेस सेंटरच्या आकर्षक डिल्ससुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे

Parcelled

एखाद्याकडे पार्सल पोहोचवणे हे खूप सोपे काम आहे, पण तेच पार्सल ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या दिवशी पोहोचवणे हेच ह्या अॅपचे काम आहे. ह्याच्या माध्यमातून आपण नमूद केलेल्या दिवशी तुमचे पार्सल ठराविक ठिकाणी पोहोचेल. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडी जास्त रक्कम मोजावी लागते.