मोटो जी (झेन ३) लाँच होईपर्यंत झेनफोन २ आणि श्याओमी mi4i चे फोन्स १०,००० हजारात येणारे हे स्मार्टफोन्स आपापसातच स्पर्धा करत होते. आणि ते थोड्याफार प्रमाणात सारखेच होते. मात्र जर आपल्याला ७००० च्याखाली येणारे स्मार्टफोन्स घ्यायचे असतील, तर आपण येथे दिलेले हे १० स्मार्टफोन्स पाहून तुम्हाला हवा तो स्मार्टफोन निवडू शकता.
श्याओमी रेडमी २ प्राइम
श्याओमी रेडमी २ प्राईम ७ हजारात येणारा सध्याचा सर्वात चांगला स्मार्टफोन आहे. श्याओमी रेडमी २ प्राईम आणि आधीचा रेडमी २ ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची बरेचशी वैशिष्ट्ये सारखीच आहेत. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 SoC देण्यात आले आहे. तसेच ह्यात रेडमी २ प्रमाणे ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. फक्त रॅम आणि स्टोरेजची क्षमता ही श्याओमी रेडमी २ प्राईममध्ये दुप्पट करण्यात आली आहे. ह्यात 2GB चे रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
यू यूफोरिया
मायक्रोमॅक्सने अधिकृतरित्या आपला नवीन नेक्स जेन स्मार्टफोन यू यूफोरिया लाँच केला आहे. ह्याची किंमत ६,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन आपल्याला अॅमेझॉनवर मिळेल. ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा ७२०पिक्सेल डिस्प्ले(TFT IPS,16.7M Color, 294 PPI) सोबत गोरिला ग्लास ३ ने संरक्षित आहे. हा ८.२५mm इतका बारीक असून आणि ह्याचे वजन १४३ ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन मेड इन इंडिया स्मार्टफोन आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास एक्सप्रेस2
मायक्रोमॅक्सने हल्लीच आपला मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क लाँच केला होता. हा त्याच स्मार्टफोनचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. हा बजेट स्मार्टफोन 1.4GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक M6592M प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या प्रोसेसरला आम्ही मागील वर्षी लाँच केलेल्या स्मार्टफोन कॅनवास नाइट कॅमियोमध्येसुद्धा पाहिले होते. आणि त्याचबरोबर झोलोच्या 8X-100 मध्येही पाहिले होते. हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसरसारखा काम करतो. त्याचबरोबर ह्यात 1GB रॅम आणि 8GB अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो. ह्या स्मार्टफोनमध्य 2500mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे. जी कंपनीनुसार साडे नऊ तास चालते.
फ्लिपकार्टवर 6199 रुपयांत खरेदी करा मायक्रोमॅक्स कॅनवास एक्सप्रेस2
लिनोवो A6000
लिनोवोची नजर आता स्वस्त 4G स्मार्टफोन बाजारावर आहे. त्यातील सर्वात उत्कृष्ट असा लिनोवोA6000 लाँच झाला आहे. ह्यात ५ इंचाचा डिस्प्ले असून हा अॅनड्रॉईड ४.४ किटकॅटवर चालतो. ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे.
श्याओमी रेडमी२
हा एका उत्कृष्ट स्मार्टफोन आहे, ज्यात एक खास डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये सर्वकाही जे आपल्याला आपल्या स्मार्टफोनमध्ये हवे असते. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 SoC देण्यात आले आहे. तसेच ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्ट लुमिया ६३०
हा ७००० च्या किंमतीत येणार एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्यात ४.५ इंचाची डिस्प्ले दिली असून त्याचे रिझोल्युशन 480 x 854 पिक्सेल आहे. हा कॉर्निंग गोरिला ग्लास ३ने संरक्षित आहेत. ह्यात ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा १८३०mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क
मायक्रोमॅक्सने आपला नवीन स्मार्टफोन कॅनवास स्पार्क लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz मीडियाटेक कोर्टेक्स A7 क्वाड-कोर SoC सह अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. हा स्नॅपडीलच्या ४,९९९रुपयांत खरेदी करु शकता. त्याशिवाय ग्राहक ह्याला आज रात्री १२ वाजल्यापासून रजिस्टर करु शकता. कॅनवास स्पार्कमध्ये ४.७ इंचाची QHD डिस्प्लेसोबत १जीबीची DDR3 रॅम आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. ह्या स्मार्टफोनचे वजन जवळपास १३४ ग्रॅम आहे आणि हा ८.५mm इतका मोठा आहे, त्याशिवाय ह्यात २०००mAhची बॅटरी आणि ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला आपण ३२जीबीपर्यंत वाढवू शकता.
स्नॅपडिलवर खरेदी करा मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क फक्त Rs. 3999
मोटो ई 4G
मोटो ई 3G मध्ये काही बदल करुन मोटो ई 4G लाँच केला गेला आहे. मात्र तरीही हा कॅमेरा आणि डिस्प्लेच्या बाबतीत ह्या प्रतिस्पर्धक म्हणून पाहिला जाऊ शकत नाही. ह्यात ब-याच उणिवा आहेत. पण जर तुम्ही स्वस्त आणि चांगला कॅमेरा असलेला फोन घेऊ इच्छिता तर तुम्ही निर्धास्तपणे हा स्मार्टफोन घेऊ शकता.
मायक्रोमॅक्स कॅनवास जूस २
हा स्मार्टफोसुद्धा आपल्यातच काही खास आहे. कमी किंमतीमध्ये ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला बरेच काही मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३०००mAh च्या बॅटरीसोबत बरेच काही महागड्या फोनसारखेच मिळत आहे.
फ्लिपकार्टवर 6739 रुपयांत खरेदी करा मायक्रोमॅक्स कॅनवास जूस २
कार्बन टायटेनियम मॅक ५
हया फोनची किंमत ५,९९९ रुपये इतकी असून हयात अॅनड्रॉईड लॉलीपॉपचाही समावेश करण्यात आलाय. सध्याच्या इतर OS पेक्षा हा स्मार्टफोन १.३ GHz क्वाड-कोअर प्रोसेसर आणि २जीबी रॅमसह देण्यात आला आहे. हया कार्बन टायटेनियम मॅक ५ ला LED फ्लॅश असलेला ८मेगापिक्सेल रियर शुटर कॅमेरा आणि सेल्फीप्रेमींसाठी BSI सेन्सर फलॅश असलेला ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हया फोनला १६ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. आणि जी ३२ जीबीपर्यंत एक्सटर्नल मेमरी कार्डद्वारा वाढवता येऊ शकते.