भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

ने Team Digit | अपडेट Apr 06 2016
भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

टेस्ला मॉडल 3 ही Elon Musk कंपनीने आतापर्यंत बनवलेल्या गाड्यांपेक्षा सर्वात आकर्षक गाडी आहे. ह्या कंपनीची ही सर्वात स्वस्त अशी इलेक्ट्रिक गाडी आहे. ही गाडी नवीन बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे, त्यात भारत देशाचाही समावेश आहे. ह्या गाडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तथापि टेस्ला मॉडल 3 भारतात २०१८ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, मात्र देशातील अनेक लोकांनी ह्या गाडीची प्री-बुकिंग केली आहे. त्यामुळे दोन वर्षात बरेच काही बदलेल, पण बदलणार नाही ते ह्या गाडीमधील तंत्र….

भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

ह्या गाडीची किंमत $35,000, जी भारतीय किंमतीप्रमाणे २३.२ लाख आहे. मात्र जेव्हा मॉडल 3 ला भारतात सादर केले जाईल, तेव्हा ह्याची किंमत आणखी जास्त असेल. काही रिपोर्टनुसार, शुल्क लागल्यानंतर ह्या गाडीची किंमत भारतात ५० लाखांच्या घरात पोहोचेल. तसे तुम्ही ह्या गाडीला आताही बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला जवळपास ६७,००० ($1000) मोजावे लागतील. मात्र भारतीय ग्राहकांना ही गाडी २०१८ मध्ये मिळेल, तर अमेरिकेतील ग्राहकांना ही गाडी २०१७ मध्ये मिळेल.

भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

डिझाईन: लक्जरी आणि कम्फर्टचे मिश्रण
टेस्ला मॉडल 3 मध्ये ५ लोक अगदी आरामात बसू शकतात. ह्याच्या रियर रुफवर आपल्याला ग्लास पॅन मिळतो, जो गाडीच्या शेवटपर्यंत जातो. ही इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे, ह्यात पुढे आणि मागील बाजूस सामान ठेवण्यासाठी जागा केली आहे. ह्या गाडीमध्ये एक मोठी टचस्क्रीन दिली आहे.

भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

इंजिन: ६० सेकंदात ०-६० मील प्रति तासाचा वेग
जर आपण यूट्युबवर “Tesla model S vs supercar” शोधाला तर आपल्याला येथे व्हिडियो दिसतील, ज्यात ह्या गाडीचा वेग तुम्ही पाहू शकता. ह्या गाडीच्या वेगामागे एक अत्यंत साधे कारण लपलेले आहे आणि ते आहे इलेक्ट्रिक गाडीमध्ये पेट्रोल गाडीप्रमाणे गियर नसतात. ही सुरुवातीपासूनच आपल्या पुर्ण शक्तीचा वापर करते. तथापि आतापर्यंत कंपनीने आपल्या ह्या गाडीच्या इंजिनविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र Elon Musk ने सांगितले आहे की, ही गाडी ६०सेकंदात ०-६० मैलाचा प्रति तासाचा वेग पकडेल.

भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

सुरक्षा: 5-स्टार रेटिंग
सुरक्षेच्या दृष्टीने टेस्ला मॉडल 3 चे सर्व व्हर्जन 5-स्टार रेटिंग सुरक्षेसह सादर केले गेले आहेत. त्या कारणामुळे ही एक उत्कृष्ट सुरक्षा इलेक्ट्रिक गाडी आहे, असे बोलू शकतो. अपघात टाळण्यासाठी गाडीचे अनेक क्रॅश चाचण्या केल्या गेल्या आहेत. ह्याची पोल क्रॅश टेस्टसुद्धा केली गेली आहे.

भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

स्मार्ट कार: ऑटोपायलट मोड
टेस्लाच्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या असण्यासोबत स्मार्टसुद्धा असतात. आपल्या मागील दोन व्हर्जनप्रमाणे ह्या मॉडल 3 मध्येसुद्धा स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार आपले मार्गदर्शन स्वत:हा करु शकते. त्याचबरोबर ही ऑटोमेटिकली ट्रॅफिकविषयी माहिती करुन घेते. ही क्रूज कंट्रोल करु शकते आणि त्याचबरोबर ही आपले लेन्ससुद्धा बदलू शकते. तथापि हे सर्व फीचर्स बेस मॉडलमध्ये उपलब्ध नसतील.

भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

आव्हाने: रेंज आणि रिचार्ज
सध्याच्या फास्ट लाइफमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे ते ही टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. ह्याच कारणामुळे ह्याला यूजर फ्रेंडली बोलले जात नाही. सुरुवातीला इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज खूप कमी होती आणि ह्याला चार्ज करायला सुद्धा बराच वेळ जात होता. तथापि, टेस्ला मॉडल 3 ची रेंज  ३४६ किलोमीटर आहे आणि ही सुपरचार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. चार्जिंग स्टेशनविषयी बोलायचे झाले तर, टेस्ला २०१८ पर्यंत भारतात आपल्या सुपर चार्जिंग स्टेशनवर काम करत आहे.