आजकाल बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स लाँच होतात, ज्यांची किंमत आपल्या बजेटच्या बाहेर आहे. अशी अनेक उदाहरण आपल्याला बाजारात मिळतील ज्यांची किंमत लाँचच्या वेळी खूप जास्त असते, मात्र त्याची कमी विक्री झाल्यावर त्यांची किंमत कमी करतात. अशाच काही फोन्सविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांची किंमत खूप जास्त होती मात्र फोनच्या कमी खपामुळे त्याची किंमत कमी केली. त्यामुळे जे कोणी फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असतील त्यांच्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर ठरेल.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 5
गॅलेक्सी नोट 5 ची किंमत लाँचच्यावेळी जवळपास ५३,९०० रुपये इतकी होती. मात्र आपण जर हा फ्लिपकार्टच्या माध्यमातून घेतला, तर हा आपल्याला ४९,९०० रुपयांत मिळेल.
एलजी G4
मुंबईमध्ये झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात एलजीने ह्या स्मार्टफोनला अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लाँच केले होते, त्यावेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ५१,००० रुपये इतकी होती, मात्र आता ह्याच्या किंमतीत खूप मोठी घट करुन हा आता ३२,९९० रुपयांत मिळेल.
एलजी नेक्सस 5X
अलीकडेच ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. लाँचच्या वेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ३१,९०० रुपये होती, मात्र आता ह्याची किंमत २४,४८९ रुपये आहे.
अॅप्पल आयफोन 6S
ह्या स्मार्टफोनला दोन महिन्याआधी भारतात लाँच केले होते. लाँचच्या वेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ६२,००० रुपये होती, मात्र आता २ महिन्यानंतर कंपनी ह्यावर १२ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे.
सोनी एक्सपिरिया Z5
हा स्मार्टफोन जेव्हा बाजारात आला होता तेव्हा ह्याची किंमत ५२,९९० रुपये होती. मात्र आता हा फ्लिपकार्टच्या आणि स्नॅपडिलच्या माध्यमातून ४७ हजार रुपयात मिळेल.