आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सविषयी माहिती देणार आहोत, जे ७००० च्या किंमतीत मिळणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स आहेत. ह्या स्मार्टफोन्समध्ये आपल्याला उत्कृष्ट आणि हाय-एंड फीचर्स मिळत आहे. चला तर माहित करुन घेऊयात ह्या स्मार्टफोन्सविषयी…
लेनोवो वाइब K5
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा फोन 1.2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415 प्रोसेसर आणि 2GB च्या DDR3 रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवली आहे. हा फोन सोनेरी, सिल्वर आणि ग्रे रंगात उपलब्ध होईल.
इनफोकस बिंगो 10
मोबाईल निर्माता कंपनी इनफोकसने आपला नवीन स्मार्टफोन बिंगो 10 लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ४,२९९ रुपये आहे आणि ह्याला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर खरेदी केले जाऊ शकते. इनफोकस बिंगो 10 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.5 इंचाची FWVGA डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480x854 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक (MT6580A) प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
इंटेक्स क्लाउड ग्लोरी 4G
मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने बाजारात आपला नवीन फोन क्लाउड ग्लोरी 4G लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या फोनला आपल्या अधिकृत साइटवरसुद्धा लिस्ट केले आहे. ह्या फोनची किंमत ३,९९९ रुपये आहे आणि हा ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्या फोनची खास गोष्ट म्हणजे 4G सपोर्ट आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा फोन काळ्या आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे.
कूलपॅड नोट 3 लाइट
मोबाईल निर्माता कंपनी कूलपॅडने भारतात आपला नवीन स्मार्टफोन नोट 3 लाइट लाँच केला आहे. हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. कंपनीच्या ह्या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक कंपनी MT6735 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
यू यूफोरिया
मायक्रोमॅक्सने ह्याच वर्षी मे मध्ये आपला यूफोरिया स्मार्टफोन लाँच केला होता, ज्याची किंमत ६,९९९ रुपये इतकी होती. ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १२८०x७२० पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० चिपसेट, 1.2GHz कोर्टेक्स A53 क्वाडकोर प्रोसेसर आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे.