फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Jul 27 2016
फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

आपला फोनमध्ये इतरांमध्ये उठून दिसावा, ह्यासाठी आजकाल प्रत्येकाल आपल्या मोबाईलमध्ये नवे-नवीन फिचर्स हवे असतात. ह्या फिचर्सच्या यादी सर्वात पहिला नंबर येतो तो, फिंगरप्रिंट सेंसरचा. मोबाईल डाटा सुरक्षा सध्या खूपच महत्त्वाचा आणि गंभीर विषय बनत चालला आहे. कारण जर तुमच्या मोबाईल योग्य सुरक्षा नसेल, तर त्यातील महत्त्वाचा डाटा गहाळ होण्याची शक्यता असते. म्हणूनच आम्ही तुमची ही अडचण लक्षात घेता, तुमच्यासाठी १०,००० रुपयाच्या किंमतीत येणा-या आणि फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असलेल्या स्मार्टफोन्सची नावे सांगणार आहोत. चला तर माहित करुन घेऊयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स….

फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

लेनोवो वाइब K4 नोट
किंमत: १०,९९९ रुपये
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080p आहे. हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे.ह्या स्मार्टफोनमध्ये 64 बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, माली T-720-MP3 दिला गेला आहे. तसेच ह्यात 3GB चे रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा PDAF रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 3300mAh ची बॅटरी देण्यात आली असून हा अॅनड्रॉईड ५.१ वर चालतो.

फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

शाओमी रेडमी नोट 3 (2GB)

किंमत:९,९९९ रुपये
ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920x1280 पिक्सेल आहे. ह्यात 2GB रॅमे आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. हा 1.8GHz हेक्सा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 4050mAh ची बॅटरी दिली आहे. ह्यात 16MP चा रियर कॅमेरा दिला गेला आहे.  

फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

LeEco Le 1S
Le 1S विषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन केवळ 7.5mm चा आहे. त्याचबरोबर ह्यात मिडियाटेक हेलिओ X10 चिपसेट दिले गेले आहे, जो 2.2GHz ऑक्टा-कोर CPU वर चालतो. त्याशिवाय ह्यात 3GB ची रॅम दिली आहे. ह्याच्या अंतर्गत स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण वाढवू शकत नाही. त्याचबरोबर ह्याचे वजन १६९ ग्रॅम आहे.ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची IPS LCD डिस्प्ले 1080p रिझोल्युशनसह दिली आहे. त्याचबरोबर ह्याची पीक ब्राइटनेस 500 निट्स जी इतकी वाईटही नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनच्या मागील बाजूकडे लक्ष दिले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे. फोटोग्राफीसाठी ह्यात 13MP चा रियर कॅमेरा ISOCELL कॅमेरा सिंगल LED फ्लॅशसह दिला गेला आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

हुआवे ऑनर 5C
किंमत: १०,९९९ रुपये
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन किरिन 650 64-बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या फोनला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे आणि ह्यावर हुआवे EMUI 4.1 दिला आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्याचे अॅपर्चर f/2.0 आहे. हा 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-यासह येतो. हा 77 डिग्री वाइड अँगल्स लेन्ससह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE सह VoLTE सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.

फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

कूलपॅड नोट 3 प्लस

किंमत: ८,९९९ रुपये
कूलपॅड नोट 3 प्लसमध्ये ५.५  इंचाची डिस्प्ले 1080x1920 पिक्सेल रिझोल्युशनसह दिली आहे. हा 1.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 3GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली आहे. ह्यात 13MP चा कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 वर चालतो.