सध्या सर्वत्र पाहायला मिळतेय ते ICC वर्ल्ड T20 इंडिया 2016 चे फीवर. अशावेळी त्या मॅचेसचे अपडेट्स मिळत राहावे, ती पाहता यावी ह्यासाठी सर्वांचे खूप प्रयत्न चालू असतात. पण कधी कधी रस्त्यात असताना, किंवा घराबाहेर असताना हे अपडेट्स न मिळत असल्यामुळे क्रिकेटप्रेमींची खूप निराशा होते. मात्र काळजी करु नका, तुमची ही समस्या सोडविण्यासाठी तुमच्या मदतीला धावून आलेत हे 5 अॅप्स.. ह्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला T20 मॅचेच्या प्रत्येक ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे आता तुमच्यासमोर टीव्ही असो वा नसो, क्रिकेट अपडेट्स मिळणे आता थांबणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ५ अॅप्स…
ICC वर्ल्ड T20 इंडिया 2016 अॅप ICC च्या ह्या ऑफिशियल अॅपच्या माध्यमातून तुम्हाला चालू असलेल्या कोणत्याही मॅचची माहिती तुमच्या फोनवरुन कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळू शकते. मग तुम्ही कुठेही असो बस, रेल्वे कुठेही. तुम्हाला केवळ हा अॅप उघडायचा आहे आणि मग हा तुम्हाला मॅचचे अपडेट्स आपोआप देईल. ह्याला आपण अॅनड्रॉईड आणि iOS दोघांवर अगदी सहजपणे चालवू शकता.
स्टार स्पोर्ट्स: लाइव स्कोर्स आणि स्ट्रीमिंग ह्या वेळेला हा अॅप सर्व मॅचेसची लाइव स्ट्रीमिंगसुद्धा करत आहे. ज्यामुळे तुम्ही आता लाइव मॅच अगदी सहजपणे पाहू शकता. तुमच्या फोनमध्येच तुम्हाला मॅच पाहता येत असल्यामुळे ज्यांच्याजवळ मॅच पाहण्याचे काही साधन नाही, अशा लोकांनाही तुम्ही तुमच्या फोनमधून ह्या मॅचेसचा आनंद देऊ शकाल.
गुगल अॅप गुगलवरसुद्धा आपल्याला ह्या टूर्नामेंटशी संबंधित सर्व माहिती मिळेल. ह्या अॅपच्या माध्यमातून लाइव स्कोअरपासून मॅचशी संबधित सर्व माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.
हॉटस्टार ह्या अॅपविषयी कदाचित तुम्हाला माहित असेलच. ह्या अॅपच्या माध्यमातून आपण ब-याच काळापासून मॅचेसशी संबंधित सर्व माहिती घेत आहात, मग ती क्रिकेट मॅच असो किंवा इतर कोणता खेळ असो. हा अॅप अजूनही सर्वांची पहिली पसंती आहे.
क्रिकबज हासुद्धा एक चांगला अॅप आहे आणि ह्या माध्यमातून आवडीच्या मॅचची कोणतीही खास माहिती अगदी सहजपणे घेऊ शकता. iOS आणि अॅनड्रॉईड डिवायसेसशिवाय हा अॅप अॅप्पल वॉचवरही उपलब्ध आहे.