सध्याच्या जगात प्रत्येकाच्या खिशात आपल्याला स्मार्टफोन्स पाहायला मिळतायत. आपल्यापैकी काही लोक तर ह्या स्मार्टफोनचा अगदी पुरेपूर वापर करतात. आपण आपल्या स्मार्टफोनमधून फोटो काढतो, आणि सध्या तर लोकांमध्ये सेल्फी घेण्याची क्रेज तर वाढत असल्याची दिसतेय. आपण आपल्या फोटोंना सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करणेसुद्धा पसंत करतो. त्यामुळेच जेव्हा आपण नवीन स्मार्टफोन्स घेण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला ह्या स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरासुद्धा हवा असतो. ज्यामुळे आपण आपल्या आनंदाच्या क्षणांना साठवून सांभाळून ठेवू शकतो. तर येथे आम्ही तुमच्यासाठी असे ११ स्मार्टफोन्स घेऊन आलो आहोत, जे आकर्षकसुद्धा आहेत आणि २०,००० च्या किंमतीत मिळतात.
ZTE नूबिया Z9 मिनी
हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर आणि सोनी IMX240 इमेज सेंसरनी सुसज्ज आहेत. ह्या स्मार्टफोनचा कॅमेरा खूपच चांगला आहे आणि ह्यात खूपच उत्कृष्ट फोटोज येतात.
मोटो X प्ले
हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसरसह येतो. ह्या स्मार्टफोनमध्ये खूपच उत्कृष्ट असा कॅमेरा मिळतो. एकूणच सांगायचे झाले तर, ह्याचा कॅमेरा २० हजाराच्या किंमतीत मिळणारा इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत खूपच चांगला आहे.
वनप्लस वन
भारतीय बाजारासाठी वनप्लस वन हे नाव काही नवीन नाही, मात्र हा स्मार्टफोन खूपच आकर्षक कॅमे-यासह येतो. ह्या कॅमे-याने आपण खूप स्पष्ट आणि चांगले फोटो काढू शकता.
श्याओमी Mi 4i
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा खूपच चांगले फोटो काढतो. ह्या स्मार्टफोनची किंमत १३ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
श्याओमी Mi 4
ह्या स्मार्टफोनमध्येही आपल्याला १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. ह्या स्मार्टफोनच्या ६४ जीबी आवृत्तीची किंमत १७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
कूलपॅड डजेन X7
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. ह्यात सोनी IMX214 सेंसर दिला गेला आहे. ह्या कॅमे-यातून आपण चांगले फोटो काढू शकतो.
मायक्रोसॉफ्ट लुमिया ६४०XL
ह्या स्मार्टफोनचा कॅमेरा आमच्या यादीत समावेश असलेल्या स्मार्टफोनच्या कॅमे-याच्या तुलनेत टिकू शकत नाही. मात्र ह्याच्या कॅमे-यानेसुद्धा चांंगले फोटो काढता येऊ शकतात.
आसूस झेनफोन सेल्फी
ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. जो की चांगले फोटो घेतो.
आसुस झेनफोन २ लेजर
हा स्मार्टफोन १० हजार रुपयात मिळतो आणि हा कॅमेरा लेजर-असिस्टेड ऑटो-फोकस सिस्टमने सुसज्ज आहे.
मिजू M2 नोट
हा स्मार्टफोनसुद्धा उत्कृष्ट कॅमे-याने सुसज्ज आहे. जर तुम्ही चांगल्या कॅमे-याचा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी J7
सॅमसंगच्या जास्त करुन सर्वच स्मार्टफोनमध्ये जो कॅमेरा असतो, तो चांगलाच असतो. हा स्मार्टफोनसुद्धा चांगल्या कॅमे-याने परिपूर्ण आहे.