दिवसेंदिवस येणारे नवेनवीन स्मार्टफोन्स आणि अॅप्स हे आजच्या तारखेला जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे एक माध्यम बनले आहे, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. तसेच ह्या स्मार्टफोन्समुळे आलेले नवनवीन अॅप्स सध्या कॉलेज युवकांच्या थोडक्यात तरुण पिढीचा अविभाज्य घटक बनले आहेत. हे अॅप्सचे माध्यम त्यांच्यासाठी केवळ एकमेकांशी कनेक्टेड राहण्याचे माध्यम राहिले नसून, आता ही तरुणाई ह्याद्वारे जगाचा स्वत:च्या पद्धतीने शोध घेतेय. म्हणूनच आम्ही येथे अशा १० अॅप्सची यादी देत आहोत, जे आजकाल तरुणांच्या स्मार्टफोनमध्ये असणे गरजेचे आहे अथवा बहुतेक तरुणांच्या फोनमध्ये ते आढळूनही येतात. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स नसतील, तर त्वरित डाऊनलोड करा. चला तर मग जाणून घेऊयात, कोणते आहेत हे अॅप्स...
Bewakoof : Bewakoof.com ही भारतात दिवसेंदिवस वाढत जाणारी फॅशन आणि लाईफस्टाइल ह्याविषयी माहिती देणारा अॅप आहे. बेवकूफ सध्याचे उच्चस्तरीय फॅशन, त्याची उपलब्धता आणि ती फॅशनप्रेमींना स्वस्त कशी उपलब्ध करुन देता येईल ह्याविषयी माहिती देतो. बेवकूफ अॅप हा तरुणांसाठी विशेषत: कॉलेज युवक/युवतींसाठी ज्यांना अगदी सहजपणे ट्रेंडी आणि स्टायलिश गोष्टी खरेदी करायच्यात त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी आहे.
Sony LIV: ज्यांना पार्टी आणि नाइट आउट्स आवडत असतील किंवा जे आपल्या आवडत्या खेळाला, त्यासंबंधी असलेल्या कार्यक्रमाला तसेच तुमचे आवडते चित्रपट यांना मिस करत असतील. अशांसाठी Sony LIV हा एक TV अॅप म्हणून म्हणून काम करतो. ज्यात तुम्हाला ऑस्ट्रेलियन ओपन सारखे आवडते कार्यक्रम, भारताची क्रिकेट सीरिज किंवा कबड्डी चॅम्पियनशिप, चित्रपट आणि Tanlines & LoveBytes सारख्या लोकप्रिय मालिका अगदी सहजपणे सोनी लाइव अॅपवर हवे तेव्हा पाहू शकतात.
Bookmein: तुम्हाला ब्युटी ट्रीटमेंटची गरज आहे? किंवा तुम्हाला स्टायलिश टॅटू काढायचा आहे? पण हे कुठे मिळेल, ह्याबाबत माहित नसेल, तर बुकमें अॅप तुमची ही समस्या सोडवतो. हा अॅप तुम्हाला तज्ज्ञांकडून व्यक्तिगत किंवा होम केअर सेवांच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देतो.
Saavn: अनेक तरुणांना पार्टीला, प्रवासात, अभ्यास करताना किंवा अगदी आयुष्यात संगीत ऐकण्याची आवड असते. त्यांच्यासाठी Saavn हा एक असा अॅप आहे, जो सध्याचे नवीनतम, ब्लॉकब्लस्टरर्स आणि आपल्या मूडला साजेशी अशा संगीताची मेजवानी देतो.
My Study Life: तुमचे क्लासेस, टास्क्स, परीक्षा आणि लेक्चर किंवा असाइनमेंटची तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करुन देण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने ह्या सर्वांचे एक नियोजन करुन देतो. त्यामुळे आता तुम्ही पेपरावरील प्लॅनरला कायमचा निरोप देऊ शकता. My Study Life हे तुमच्या पेपर प्लॅनरप्रमाणे किंवा त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो.
Kindle: संपुर्ण जग सध्या डिजिटल बनत चाललय. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा अॅप त्याच्या किलो वजनाचे असलेल्या पुस्तकांचे ओझे आता अगदी ग्रॅममध्ये बनवून आता हे आपण हवे तेथे घेऊन जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पब्लिशर्स सर्व पुस्तके, ज्यांची किंमत खूप जास्त आहे, अशा पुस्तकांना ह्या Kindle Store वर कमी पैशात उपलब्ध करुन देतो.
Google Maps and Navigation: कॉलेज विद्यार्थ्यांना एकूणच तरुणांना नवनवीन शहरांमध्ये तसेच नवीन देशांमध्ये प्रवास करणे खूप आवडते. गुगल मॅप्स तुम्हाला इतर शहरांमध्ये योग्य ठिकाणी जाण्यासाठी किंवा पार्टीच्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी खूप मदत करतो.
Whatsapp: हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा आणि मोफत असा मेसेजिंग अॅप बनला आहे. हा अॅप तुम्हाला व्यक्तिगत तसेच ग्रुप चॅट्ससाठी आणि एकमेकांशी जोडण्यासाठी मदत करतो. ह्याद्वारे तुम्ही आपल्या मित्रजनांशी चर्चा करु शकता तसेच चित्रे, व्हिडियोज आणि व्हॉइस चॅट्सद्वारे सध्याच्या घडामोडींविषयीही चर्चा करु शकता.
Scootsy: वेगवेगळ्या पार्ट्या तसेच गेट टुगेदर आयोजित करणे हा एक प्रकारचा महत्वाचा असा टास्क असतो. कारण त्यासाठी लागणारे जेवण बनवणे, किंवा बाहेरुन मागवणे इ. खूप महत्त्वाची अशी कामे असताता. scootsy अॅपच्या माध्यमातून तुम्हाला हव्या त्या डिशेसची, जेवणाची केवळ १ तासात घरपोच डिलिव्हरी मिळते.
Evernote: लेक्चर्समध्ये नोट्स लिहून घेणे हे खरेच खूप अवघड काम आहे आणि त्यानतंर ते रात्रभर लिहित बसणे हे त्याही पेक्षा अवघड काम आहे. त्यासाठी सध्याचा लोकप्रिय असा Evernote अॅप हा तुम्हाला ह्या नोट्स लिहिण्यासाठी मदत करतो तसेच ह्यासाठी तो इमेजेस आणि व्हॉइस नोट्सचाही वापर करतो. त्यामुळे ह्या अॅपचा वापर करुन तुम्हाला तुमची रात्रीची झोप पुर्ण घेता येईल. नाही का?