हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट May 11 2016
हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

ह्या वर्षी उत्कृष्ट वैशिष्ट्ये असलेल्या आकर्षक स्मार्टफोन्सनी जणू सपाटाच लावलाय असे आपण बोलू शकतो. अलीकडेच लाँच झालेल्या आयफोन SE आणि शाओमी रेडमी नोट 3 ने सर्वांनाच आश्चर्यचकितच करुन टाकले. त्याचबरोबर सॅमसंगनेसुद्धा आपल्या गॅलेक्सी सीरिजचे S7 आणि S7 एज लाँच करुन एका नवा अध्यायच सुरु केला. मात्र अजूनही २०१६ मध्ये लाँच होणा-या स्मार्टफोन्सचे चक्र काही संपलेले नाहीय. येणा-या काही दिवसात अजून काही आकर्षक स्मार्टफोन्स लाँच होण्याच्या मार्गावर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, कोणते आहेत हे स्मार्टफोन्स…

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

मोटो G4
मोटोरोला मोटो G4 प्लसमध्ये एक तेज असे फिंगरप्रिंट सेंसर असू शकते, जे फोनच्या होम बटनवर असेल. त्याशिवाय दुस-या स्मार्टफोन मोटो G4 मध्ये कदाचित फिंगरप्रिंट सेंसर नसेल. असे सांगितले जातय की, हा स्मार्टफोन मेटल बोड आणि प्लॅस्टिक फ्रेमसह येईल. अलीकडेच समोर आलेल्या लीक्सनुसार, ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले असू शकते. तसेच ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. त्याचबरोबर मोटो G4 मध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि मोटो G4 प्लसमध्ये 16MP चा रियर कॅमेरा असू शकतो.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

मोटो G4 प्लस
मोटोरोला मोटो G4 प्लसमध्ये एक तेज असे फिंगरप्रिंट सेंसर असू शकते, जे फोनच्या होम बटनवर असेल. त्याशिवाय दुस-या स्मार्टफोन मोटो G4 मध्ये कदाचित फिंगरप्रिंट सेंसर नसेल. असे सांगितले जातय की, हा स्मार्टफोन मेटल बोड आणि प्लॅस्टिक फ्रेमसह येईल. अलीकडेच समोर आलेल्या लीक्सनुसार, ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले असू शकते. तसेच ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. त्याचबरोबर मोटो G4 मध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि मोटो G4 प्लसमध्ये 16MP चा रियर कॅमेरा असू शकतो.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

आसूस झेनफोन 3

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी आसूस 30 मे ला एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. आशा आहे की, ह्या कार्यक्रमात कंपनी आपल्या नवीन झेनफोन 3 च्या सीरिजमध्ये लाँच करेल. त्यासाठी कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक काउंटडाऊन सुद्धा लावले आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हे काउंटडाऊन आपण पाहू शकता. त्याशिवाय ह्या काउंटडाऊनवरुन असे दिसून येत आहे की, कंपनी हा नवीन डिवाईस इंटेलच्या प्रोडक्टसह लाँच करु शकतो.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

नेक्स्टबिट रॉबिन

ह्या स्मार्टफोनची किंमत ४०० डॉलर म्हणजेच २८,००० रुपये असू शकते. अमेरिकेत ह्या स्मार्टफोनची किंमत इतकीच आहे. त्याशिवाय भारतात ह्याच्या किंमतीविषयी अजून काही माहिती दिलेली नाही. ह्या कंपनीचे निर्मिती त्या दोन व्यक्तींनी केली आहे, जे ह्याआधी गुगल अॅनड्रॉईड टीमवर काम करत होते, म्हणजेच Tim Moss आणि Mike Chan. ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची पुर्ण HD १०८०x१९२० पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात एक फंकी प्लॅस्टिक बॉडी लावली आहे. स्मार्टफोन आपल्याला मिंट आणि मिडनाइट अशा दोन रंगात अगदी सहज मिळेल. नेक्स्टबिटचा हा रॉबिन स्मार्टफोन क्वाल-कॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसरसह येतो आणि ह्यात ३जीबीची रॅमसुद्धा दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबीचे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकत नाही, कारण ह्यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट नाही. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात वापरण्यात आलेले क्लाउड स्टोरेज. त्यामुळे तुमचे जास्तीचे स्टोरेज तुम्ही क्लाउड स्टोरेजमध्ये ठेवू शकता आणि कधीही आपल्या फोनसाठी वापरु शकता. मात्र हे क्लाउड भारतीय यूजर्ससाठी एक समस्या असू शकते. कारण त्यांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी कदाचित मिळणार नाही.  त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

मिजू M3 नोट
चीनमध्ये ह्या स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले गेले आहे, ज्याचे पहिले व्हर्जन 2GB रॅम आणि 16B च्या अंतर्गत स्टोरेजचे असेल. ह्याची किंमत CNY 799 जवळपास ८,२०० रुपयाच्या आसपास आणि दुसरा व्हर्जन 3GB रॅम आणि 32GB स्टोेरज असलेल्या स्मार्टफोनची किंमत CNY 999 जवळपास १०,३०० रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लाईमी ओएस अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080x1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिले गेले आहे, जे 1.8GHz गती देतो. त्याचबरोबर ह्यात 2GB आणि 3GB च्या LPDDR3 रॅम दिली गेली आहे. त्याशिवाय ह्यात दिलेल्या अंतर्गत स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

ऑनर 5C

स्मार्टफोनमध्ये किरिन 650 चिपसेटसह 1.7GHz चे (4xCortex-A53@2.0 GHz + 4xCortex-A53@1.7GHz) ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 16GB चे ऑनबोर्ड स्टोरेज आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅश आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ऑनर 5C हा एक ड्यूल सिम आणि मल्टीब्रँड 2G/3G सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे, जो Cat.6 LTE (केवळ 4G व्हर्जन) ला सुद्धा सपोर्ट करतो. त्याशिवाय ब्लूटुथ v4.1, FM रेडियो रिसिवरसुद्धा दिला गेला आहे. हा फोन सध्यातरी चीनमध्ये मिळत आहे. ऑनरच्या 5C च्या 3G सपोर्ट मॉडलची किंमत CNY 899 (139 यूएस डॉलर) मध्ये आणि 4G सपोर्ट मॉडलची किंमत CNY 100 आहे.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

मोटो X 2016

२ दिवस दिवसांपूर्वी आम्ही मोटोरोलाच्या मोटो X 2016 चे नवीन फोटो दिसली आहे. हाँग-काँगची एक वेबसाइटद्वारा ह्या फोनची अनेक चांगले फोटो दाखवले गेले आहेत. ह्या फोटोच्या माध्यमातून असे दाखवले जात आहे, की ह्या स्मार्टफोनला एक नवीन डिझाईन दिले गेले आहे आणि हा स्मार्टफोन मोटोरोलाच्या मागील स्मार्टफोन्स सारखा नाहीय. ह्या फोटोंमध्ये असे दाखवले जात आहे, ह्या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक कर्व्ह्ड दिला गेला आहे. त्याचबरोबर हा खूपच आकर्षक डिझाईन असलेला स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनला खूपच पातळ बनवले आहे. त्याशिवाय ह्याच्या कडा गोल कल्या आहेत. जे आपण मोटोरोलाच्या मागील स्मार्टफोन्समध्ये पाहिले होते. फोनमध्ये मेटल बॉडी दिली गेली आहे.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

वनप्लस 3
फोनमध्ये SD820 चिपसेट, 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. हा फोन अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर काम करतो. ह्या फोनमध्ये एक पुर्ण HD रिझोल्युशन असलेली डिस्प्ले असेल, ह्या डिस्प्लेचा आकार 5 इंचाचा असेल. ह्याआधी समोर आलेल्या लीक्समध्ये असे सांगितले गेले होते की, ह्या फोनमध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले असू शकते.

हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

शाओमी रेडमी 3
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 64 बिट 1.2GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि 2GB रॅंमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 4100mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याशिवाय हा एक ड्यूल सिम ड्यूल स्टँडबाय स्मार्टफोन आहे. हा हायब्रिड सिम स्लॉटसह येईल.