मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने आपला नवीन स्मार्टफोन वनप्लसX भारतात लाँच केले. जर वनप्लस Xच्या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलायचे झाले तर, ग्लास व्हर्जन वनप्लस x ओनिक्स ब्लॅकग्लाससह लाँच झाला आहे. ह्याची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्याचे वजन १३८ ग्रॅम आहे. तर त्याच्या दुस-या व्हर्जन वनप्लस X सेरामिकविषयी बोलायचे झाले तर, ह्यात जिर्कोनियाचा वापर केला गेला आहे आणि ह्याची किंमत २२,९९९ रुपये आहे. ह्याचे वजन १६० ग्रॅम आहे. ह्यात ५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एक हायब्रिड ड्युल सिमसुद्धा आहे. वनप्लस X स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस २.१ वर चालेल. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा स्मार्टफोन 2.3GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ADAFसह १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
मात्र ह्या स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेल्या ५ स्मार्टफोनशी कडक टक्कर द्यावी लागणार. कोणते आहेत ते स्मार्टफोन चला जाणून घेऊयात-
आसुस झेनफोन २
झेनफोन २चा ४जीबी रॅम आणि १६जीबी इनबिल्ट स्टोरेजचा नवीन व्हर्जन लाँच केला आहे. ह्याची किंमत २२९ डॉलर (जवळपास १५,००० रुपये) आहे. झेनफोन २ च्या ह्या नवीन प्रकारात १.८GHz क्वाड-कोर इंटेल एटम Z360 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD (१०८०x१९२० पिक्सेल) IPS डिस्प्ले, कॉर्निंग गोरिला ग्लास ३चे प्रोटेक्शन, मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट, ड्यूल सिम LTE, १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि ३००० mAh ची बॅटरी दिली
गेली आहे.
श्याओमी Mi 4
श्य़ोओमी mi 4 हा पैसा वसूल करणारा असा फोन आहे. मात्र ह्यात १६जीबी अंतर्गत स्टोरेजसह मायक्रो-एसडी कार्डसाठी कोणतेही स्थान न देणे हे आमच्यासाठी डील ब्रेकर आहे. जर आपण २० हजारापेक्षा कमी किंमतीत फोन घेऊ इच्छिता, तर आपण ऑनर ६ खरेदी करु शकता. जर आपण स्नॅपड्रॅगन ८०१ सुसज्ज डिवाइस प्रेमी आहात, तर आपण वनप्लस वन घेऊ शकता.
इनफोकस M8 10
ह्या स्मार्टफोनमध्ये ३२ बिट क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८०१ क्वाड-कोर सह २.५GHz स्पीडसह मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात एड्रेनो 330 GPU आणि २जीबी LPDDR3 रॅम दिली गेली आहे. हा एक नवीन हाय-एंड स्मार्टफोन लॉलीपॉपसह कपल केल्या गेलेल्या इनलाइफ युआयवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची १०८०x१९२० पिक्सेल रिझोल्युशन सह 401 ppi पिक्सेल तीव्रता असलेली डिस्प्ले मिळत आहे.
लिनोवो वाइब P1
ह्यात ५.५ इंचाचा पुर्ण HD IPS डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे. ह्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ने संरक्षित केले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १.५ गिगाहटर्ज स्नॅपड्रॅगन ६१५ ऑक्टा-कोर प्रोसेसर, एड्रेनो ४०५GPU आणि ३जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १६ जीबीचे अंतर्गज स्टोरेजसुद्धा दिले आहे.
वनप्लस वन
वनप्लस वनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, जी गोरिल्ला ग्लास ३ने सुरक्षित आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ३जीबी रॅम आणि ६४जीबीच्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ५७८MHz एड्रेनो ३३० GPU सुद्धा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. वनप्लस वन अॅनड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि ह्यात ३१००mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे.