मोटोरोलाने आपल्या नवीन स्मार्टफोन मोटो X प्ले ला भारतात लाँच केले आहे. ह्याच्या १६ जीबी व्हर्जनची किंमत १८,४९९ ठरविण्यात आली आहे. हा आसूस झेनफोन २ आणि श्याओमी Mi4 ला टक्कर देणार. ह्यात क्वालकॉम स्नॅडपड्रॅगन ६१५ प्रोसेसर दिला गेला आहे.
सुरुवात करण्याआधी ह्याच्या ठळक वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूयात.
प्रोसेसर- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५
रॅम- २जीबी
डिस्प्ले- ५.५ इंच १०८०p
कॅमेरा- २१ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
स्टोरेज- १६/३२ जीबी
बॅटरी- ३६३०mAh
पहिल्यांदा बघितल्यावर हा फोन मोटो जी (तिसरी पिढी) चा मोठा अवतार दिसतो. ह्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूस स्टिरिओ स्पीकर्स दिले गेले आहेत. ह्याच्या समोरील बाजूस ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वरच्या बाजूस ड्यूअल सिम स्लॉट आणि ३.५ एमएमचा हेडफोन जॅक दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये मायक्रो-SD कार्ड दिले गेले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मेमरीला १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. ह्याच्या तळाशी मायक्रो युएसबी पोर्ट दिला गेला आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये सरळ बाजूला पॉवर बटण आणि आवाजाचे बटण दिले गेले आहे.
मोटोरोला मोटो x प्लेमध्ये ५.५ इंचाची १०८०p डिस्प्ले दिली गेली आहे जे बरेच चांगले आहे. ह्याच्या पाहण्याचे कोन (एँगल्स) खूप उत्कृष्ट आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सेल रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या फोनच्या आधी मोटो टर्बो कंपनीने २१ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेला होता. जरी ह्या दोघांचा मेगापिक्सेल एकसारखाच होता तरीही. परंतू मोटो X प्ले ची चित्राची गुणवत्ता खूप जास्त चांगली आहे.
जरी ह्या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सेल कॅमेरा दिला गेला आहे, मात्र ह्या फोनने तुम्ही ४के व्हिडिओ बघू शकत नाही.
मोटोरोला मोटो X प्ले काळा आणि पांढरा अशा २ रंगात उपलब्ध होईल. ह्याच्या मागील बाजूस सॉफ्ट टच मॅटसारखे मटेरियल वापरले आहे आणि ह्या फोनला अगदी आरामात तुम्ही हातात पकडू शकता.
ह्याच्या मागील बाजूस काढू शकता आणि विविध रंगांच्या मागील कव्हरने बदलू शकता. मोटोरोला ह्याचे फ्लिप कव्हर्ससुद्धा उपलब्ध करत आहेत.