भारतीय बाजारात १० हजार रुपयात येणारे अनेक आकर्षक स्मार्टफोन्स आहेत, मात्र आमच्या मताप्रमाणे ह्या विभागात येणारे टॉप तीन स्मार्टफोन्स आहेत, ते म्हणजे- मिजू M2 नोट, कूलपॅड नोट 3 आणि यू यूरेका प्लस. मात्र विचार करण्याची गोष्ट म्हणजे ह्या तिघांमध्ये सर्वात उत्कृष्ट स्मार्टफोन कोणता? हे माहित करुन घेण्यासाठी ह्या स्मार्टफोन्सची झटपट तुलना करुन घेऊयात..
मिजू M2 नोट
डिस्प्ले: 5.5 इंच,1080p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल
बॅटरी: 3100mAh
किंमत: ९,९९९ रुपये
सर्वात खास वैशिष्ट्य: चांगली डिस्प्ले
कूलपॅड नोट 3
डिस्प्ले: 5.5 इंच, 720p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅम: 3GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल
बॅटरी: 3000mAh
किंमत: ८,९९९ रुपये
सर्वात खास वैशिष्ट्य: फिंगरप्रिंट सेंसर
यू यूरेका प्लस
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल
बॅटरी: 2500mAh
किंमत: ८,९९९ रुपये
सर्वात खास वैशिष्ट्य: चांगली कामगिरी
डिस्प्ले
तिन्ही स्मार्टफोन्समध्ये ५.५ इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. तिघांमध्ये केवळ कूलपॅड नोट 3 मध्येच 720p ची डिस्प्ले दिली गेली आहे. इतर दोन फोन्समध्ये 1920x1080p रिझोल्युशनची डिस्प्ले दिली गेली आहे. तथापि आम्हाला आमच्या परीक्षणात असे आढळून आले की, मिजू M2 नोटमध्ये IGZO पॅनलमुळे हा ह्या विभागातील सर्वोत्कृष्ट डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. ह्यात खूप चांगले व्ह्युविंग अँगल्स आणि खूप चांगला कलर प्रोडक्शन मिळतो. तथापि, ह्यात एकच कमी आहे आणि ती म्हणजे ह्याचा डिस्प्ले स्मूथ नाही, इतर दोन्ही स्मार्टफोन्सचा टच स्मूथ आहे.
विजेता: मिजू M2 नोट
रचना आणि डिझाईन
ह्या विभागात येणा-या सर्व स्मार्टफोन्स प्लॅस्टिकने बनवले आहे, तथापि, ह्या विभागात असलेला इनफोकस M535 मेटल बिल्डसह येतो. तथापिस आम्ही ज्या तीन स्मार्टफोन्सची तुलना करत आहोत, त्यात मिजू M2 नोटचे डिझाईन सर्वात चांगले आहे. ह्यात राउंडेड एजेस आहेत, ज्याने हा स्मार्टफोन पकडणे खूप सोपे होते. तर रचनेमध्ये कूलपॅड नोट 3 तिघांमध्ये उत्कृष्ट आहे. ह्यात मेटल बँड फोनच्या चारही बाजूस दिले गेले आहे.
डिझाईन विजेता: मिजू M2 नोट
रचना विजेता: कूलपॅड नोट 3
युआय
कूलपॅड नोट 3 आणि मिजू M2 नोट दोघांमध्ये अॅनड्रॉईड लॉलीपॉपच्या वर कस्टम युआय आहे. तथापि, आमच्या मताप्रमाणे यू यूरेका प्लसचा युआय सर्वात चांगला आहे.
विजेता: यू यूरेका प्लस
कामगिरी
आम्ही तिन्ही स्मार्टफोन्सचा रिव्ह्यू केला आहे आणि तिन्ही स्मार्टफोन्समध्ये यू यूरेका प्लसची कामगिरी खूप चांगली आहे. ह्या स्मार्टफोनवर गेमिंगचा खूप चांगला अनुभव मिळतो.
विजेता: यू यूरेका प्लस
कॅमेरा
ह्या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. तथापि, ह्यात मिजू M2 नोटचा कॅमेरा खूप चांगला आहे. हा स्मार्टफोन कमी प्रकाशात चांगले फोटो काढतो.
विजेता: मिजू M2 नोट
बॅटरी लाइफ:
यू यूरेका प्लस स्मार्टफोनमध्ये 2500mAhची बॅटरी दिली गेली आहे, जी ६.६ तास काम करते. तर मिजू M2 नोटची बॅटरी 8 तासांपर्यंत चालते. तथापि, कूलपॅड नोट 3 ची बॅटरी सर्वात जास्त चांगली आहे. ही १० तास चालते.
विजेता: कूलपॅड नोट 3
निष्कर्ष:
यू यूरेका प्लस आणि कूलपॅड नोट 3 मध्ये सर्वात चांगले फीचर्स आहेत. मात्र सर्व क्षेत्रात पाहिले तर, मिजू M2 नोट ची कामगिरी खूप चांगली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये चांगली डिस्प्ले, चांगली कामगिरी आणि चांगला कॅमरा आहे. कूलपॅड नोट 3 ह्या तुलनेत दुस-या स्थानावर आहे. ह्यात चांगली रचना आणि चांगली बॅटरी लाइफ मिळते. ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा आहे. यू यूरेका प्लस तिस-या स्थानावर आहे. ह्यात चांगली कामगिरी आणि चांगला इंटरफेस मिळतो.
अंतिम विजेता: मिजू M2 नोट