आपल्या सर्वांना माहितच आहे की, ह्या महिन्यात किंवा ह्याआधी अनेक चांगले मोबाईल फोन निर्माता कंपनींनी आपल्या स्मार्टफोन्सला भारताबाहेर अन्य देशातील बाजारात लाँच केले आहे. आणि हे स्मार्टफोन्स अजूनपर्यंत भारतात लाँच केले गेले नाही. पण असे सांगितल जातय की, लवकरच हे स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जातील. त्यातील काही स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहे मात्र काही लाँच करणे बाकी आहे. आणि असेही सांगितले जातय की, मोठ्या कंपनी जसे अॅप्पल, हुअावे, गुगल, मोटोरोला, सॅमसंग, श्याओमी, सोनीचे आकर्षक फोन्स दिवाळीच्या जवळपास लाँच करतील. कारण ह्या कंपन्यांना माहित आहे की, ह्या काळात भारतीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. तर काही लोकांचा आपले जुने स्मार्टफोन्स विकून नवीन स्मार्टफोन्स घेण्याकडे कल असतो. त्यासाठी कंपन्या आपल्या फोन्सवर अनेक वेगवेगळ्या ऑफर्ससुद्धा देतात. तर मग आपण तयार आहात का, हे स्मार्टफोन्स आणि ह्यावर मिळणा-या चांगल्या ऑफर्स जाणून घ्यायला? जाणून घेऊयात हे कोणते स्मार्टफोन्स असू शकतात.
श्याओमी Mi 4c
चीनची निर्माता कंपनी श्याओमीने आपला नवीन स्मार्टफोन Mi 4c लाँच केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोन्सला चीनच्या बाजारातच आणले आहे आणि असे सांगितल जातय की, लवकरच हा स्मार्टफोन भारतातसुद्धा उपलब्ध होईल. श्याओमी Mi 4c च्या दोन आवृत्ती लाँच केल्या आहेत, १६जीबी आणि ३२ जीबी. ह्याच्या १६ जीबी आवृत्ती सोबत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी सोबत ३जीबी रॅम दिली गेली आहे. श्याओमी Mi 4c मध्ये ५ इंचाचा पुर्ण एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. ही स्क्रीन गोरिला ग्लास ३ने सुरक्षित आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या नवीन यूजर इंटरफेस Mi UI7 वर चालतो. हा यूजर इंटरफेस अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ५.१ लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. त्याचबरोबर ह्यात ३०८०mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
मोटोरोला मोटो X स्टाइल
मोटोरोला मोटो एक्स स्टाईलच्या वैशिष्टयांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाची क्वाडएचडी डिस्प्ले ५१५ppi पिक्सेल तीव्रतेसोबत दिली गेली आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसरसोबत १.८GHz हेक्सा-कोर प्रोसेसरला ३जीबी रॅमसोबत जोडले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉपवर चालतो. त्याचसोबत हा मोटोरोलाच्या काही चांगल्या वैशिष्ट्यांसह जसे की मोटो वॉयस, मोटो असिस्ट, मोटो डिस्प्ले, मोटो अॅक्शन इत्यादींसोबत येतो. हा आपल्याला अनेक प्रकारांत १६/३२/६४जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध होईल. त्याचबरोबर आपल्याला ह्याची स्टोरेज क्षमता वाढवण्यासाठी ह्यात एसडी कार्ड स्लॉटसुद्धा दिला गेला आहे. ह्याच्या माध्यमातून आपण ह्याच्या स्टोरेजला १२८जीबीपर्यंत वाढवू शकता. जर ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चर सोबत दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. त्याचसोबत ह्यात एक फ्लॅशसुद्धा दिले गेले आहे. ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट सेल्फी घेऊ शकता. हा कॅमेरा ४के व्हिडिओ घेण्यास सक्षम आहे. त्यासोबतच ह्यात ३०००mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी दिली गेली आहे.
लिनोवो ज्यूक Z1
ह्या स्मार्टफोनची किंमत CNY १,७९९ (जवळपास १८,२५० रुपये) आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये धातूची फ्रेम दिली गेली आहे. Zuk ब्रँडच्या नावाने लाँच झालेला हा लिनोवोचा पहिला स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनला चीनच्या बाहेर लाँच करण्याचा कंपनी विचार करत आहे. स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण एचडी डिस्प्ले (१०८०x१९२० पिक्सेल) दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात एक फिजिकल होम बटण ह्याच्या पुढील पॅनलवर दिले गेले आहे. ह्या होम बटणमध्ये फिंगरप्रिंट सेंसरचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर हल्लीच लाँच झालेले फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससारखेच ह्या स्मार्टफोनमध्येही युएसबी टाइप-C3.0 पोर्ट दिला गेला आहे.
हुआवे G8
हुआवेचा नवीन स्मार्टफोन G8 आपल्याला गडद चंदेरी, सोनेरी आणि पांढ-या रंगात अगदी सहजपणे मिळेल. जर ह्याच्या विशिष्ट निर्देशांवर लक्ष दिले असता स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची FHD डिस्प्लेसोबत एक 2.5D वक्र असलेली गोरिला ग्लास दिली आहे. ह्या स्मार्टफोनला धातूचे बनवले गेले आहे. याचाच अर्थ असा की ह्याची संपुर्ण बॉडी पुर्णत: धातूची आहे. आणि हेच ह्या स्मार्टफोनचे विशेष आकर्षण सांगितले जातय.
ZTE एक्सॉन एलीट
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ड्युल कॅमेरा सेटअप (१३ मेगापिक्सेल फोटोसाठी+ २ मेगापिक्सेल खोलवर इफेक्ट देण्यासाठी) आहे. त्याचबरोबर ह्यात फिंगरप्रिंट सेंसर, वॉयस आणि आय स्कॅनिंगसारखी बायोमॅट्रिक वैशिष्ट्ये दिली गेली आहेत. स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची १०८० पिक्सेल डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ८१० चिपसेट दिला गेला आहे.
आसुस झेनफोन झूम
प्रोसेसर: इंटेल अॅटोम Z3580, क्वाड-कोर २.३GHz
कनेक्टिव्हिटी: ४जी, ड्युल सिम
रॅम/स्टोरेज: २जीबी/४ जीबी(१६/३२/६४/१२८ जीबी)
बॅटरी: 3000mAh
डिस्प्ले: ५.५ इंच, १०८० पिक्सेल
कॅमेरा: १३ मेगापिक्सेल, 3X ऑप्टिकल झूम
मेमरी कार्ड सपोर्ट: आहे.(६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो)
ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड लॉलीपॉप
ऑनर7i
अखेरीस हुआवेने आपला बहूचर्चित स्मार्टफोन ऑनर 7i लाँच केला. ह्याच्या अधिकृत घोषणेसह ही अफवासुद्धा खरी झाली आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये फ्लिप आऊट कॅमेरा असेल. ह्या अफवेवर सुद्धा पुर्णविराम लागला आहे. स्मार्टफोनमध्ये खरच एक फ्लिपआऊट कॅमेरा आहे. आता जर तुम्ही असा विचार करत असाल की हा फ्लिप आऊट नक्की काय आहे, तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, ऑनर 7i मध्ये एक असा कॅमेरा दिला गेला आहे ,ज्याला आपण पुढील दिशेला फिरवले असता तो फ्रंट कॅमेरामध्ये बदलतो. त्यामुळे आता असे सांगितले जातय की, हुआवेने आपल्या स्मार्टफोनसोबत हा जो प्रयोग केला आहे तो यश प्राप्त करत असल्याचे चित्र दिसत आहे.
अॅप्पल आयफोन 6S प्लस
अमेरिकेत सेनफ्रान्सिस्कोच्या ग्रॅहम सिविक ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान टेक कंपनी अॅप्पलने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स आयफोन 6S आणि 6S प्लस लाँच केले आहे. एवढच नाही तर, अॅप्पलने ह्यासोबत आयपॅड प्रो, अॅप्पल वॉच, आयपॅड मिनी२, अॅप्पल टिव्ही आणि अॅप्पल पॅसिललासुद्धा लाँच केले आहे. आयपॅड मिनी२ ची किंमत आता २६९ डॉलर केली आहे. तर अॅप्पल पॅसिलची किंमत ९९ डॉलर ठेवण्यात आली आहे.
सोनी एक्सपिरिया Z5
सोनीने आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन ज्याच्या बद्दल गेल्या काही काळापासूून अफवा एेकायला मिळत होती, अखेरीस त्याची घोषणा केली आहे. सोनीने एक्सपिरिया Z5,Z5 कॉम्पेक्ट आणि Z5 प्रीमियम स्मार्टफोन्सला IFA 2015 मध्ये सादर केले. सोनीचा Z5 प्रीमियम स्मार्टफोन्स जगातील एकमात्र असा पहिला स्मार्टफोन बनला आहे जो ४के डिस्प्लेसह लाँच केला जाईल. त्याचबरोबर सोनी आपले २ स्मार्टफोन्स एक्सपिरिया Z5 आणि Z5 कॉम्पॅक्टला जगभरात ऑक्टोबर २०१५ मध्ये लाँच करेल. त्याचबरोबर सोनीचा पुढील फोन Z5 प्रीमियमला नोव्हेंबरमध्ये लाँच करण्याची योजना बनवली गेली आहे. एक्सपिरिया Z5 आणि Z5 प्रीमियम हे दोन्ही स्मार्टफोन्स सिंगल आणि ड्यूल सिम अशा २ प्रकारांत लाँच केले जातील.