बंगळूरुमध्ये झालेल्या कार्यक्रमात जिओनी मॅरेथॉन M5 लाँच केला. ह्या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रुपये आहे आणि हा फ्लिपकार्टच्या माध्यमातून अगदी सहजपणे खरेदी करु शकता. स्मार्टफोनमध्ये 6020mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे.ह्याची बॅटरी ६५ तास टॉकटाइम देण्यास सक्षम आहे. चला तर मग जाणून घेऊया ह्याची वैशिष्ट्ये.
ह्या स्मार्टफोनमध्ये १.३GHz मिडियाटेक प्रोसेसर दिला गेला आहे, ह्यात 3GB ची रॅम दिली आहे.
फोनमध्ये 13MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
फोनच्या वरच्या बाजूस हेडफोन जॅक दिला गेला आहे.
फोनमध्ये जिओनीचाही Amigo ३.१ युआय दिला आहे, जो अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे.
स्मार्टफोन मॅरेथॉन M5 मध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
स्मार्टफोनच्या बॅकमध्ये एक स्पीकर ग्रिल्ससुद्धा दिला गेला आहे.
त्याचबरोबर जर आपण ह्याच्या खालच्या बाजूस पाहिले तर आपल्याला मायक्रो-यूएसबी पोर्ट दिसेल.
स्मार्टफोनमध्ये वॉल्यूम रॉकर, सिम कार्ड ट्रे आणि पॉवर बटण उजव्या बाजूस दिले गेले आहे.