चित्रांच्या माध्यमातून माहिती करुन घ्या कूलपॅड नोट ३विषयी… काय विशेष आहे ह्या स्मार्टफोनमध्ये
चित्रांच्या माध्यमातून माहिती करुन घ्या कूलपॅड नोट ३विषयी… काय विशेष आहे ह्या स्मार्टफोनमध्ये
हल्लीच कूलपॅडने आपला नवीन स्मार्टफोन नोट३ ला बाजारात आणले. ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे ह्या किंमतीत आपल्याला कंपनी स्मार्टफोनमध्ये काही ठळक वैशिष्ट्येसुद्धा देत आहे. चला तर माहित करुन घेऊयात काय काय वैशिष्ट्ये आहेत ह्या स्मार्टफोनची…..
ह्या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायच्या आधी आपण नजर टाकूयात याच्या ठळक वैशिष्ट्यांवर!!!
प्रोसेसर: मीडियाटेक MT6753
रॅम: ३जीबी डिस्प्ले,५.५ इंच,७२० पिक्सेल
स्टोरेज: १६जीबी
कॅमेरा: १३मेगापिक्सेल, ५मेगापिक्सेल
बॅटरी: ३०००mAh
किंमत: ८,९९९ रुपये
चला तर मग ह्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेपासून सुरुवात करुया. स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १२८०x७२० पिक्सेल आहे.
ह्या डिस्प्लेच्या खाली, ३ नेविगेशन कीज मिळतील, मात्र त्यात लाइट दिसणार नाही.
डिस्प्लेच्या वरच्या बाजूस, फोनमध्ये काही सेंसर आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे.
फोनमध्ये डाव्या बाजूला वॉल्यूम रॉकर बटन्स आहेत, येथे आपण पाहू शकता.
त्याचबरोबर ह्या फोनमध्ये उजव्या बाजूला आपल्याला पॉवर बटण मिळेल ह्याला सुद्धा आपण येथे पाहू शकता.
त्याचबरोबर ह्याच्या तळाशी लक्ष दिले तर, आपल्याला मायक्रो-युएसबी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅकसुद्धा मिळेल.
फोनमध्ये प्लॅस्टिकचा वापर केला गेला आहे. मागील बाजूस फोनला मॅट फिनिश दिली गेली आहे, जे फोन पकडण्यास आपल्याला मदत करते तसेच तुमच्या बोटांचे ठसेसुद्धा त्यावर दिसत नाही.
स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर आपण ह्यात दिला गेलेला फिंगरप्रिंट सेंसरसुद्दा येथे पाहू शकता.