शाओमीने मागील आठवड्यात चीनमध्ये लहान मुलांसाठी MI “बनी”स्मार्टवॉच लाँच केली होती. ह्या स्मार्टवॉचची किंमत चीनी युआनमध्ये 299(३००० रुपये) आहे.
शाओमीने ही पहिली अशी स्मार्टवॉच बनवली आहे. ह्या वॉचमध्ये अनेक फीचर्सचा समावेश आहे. ह्या स्मार्टवॉचची खास गोष्ट म्हणजे ह्यात GPS कनेक्टिव्हीटी आहे, जी Wi-Fi आणि ग्लोनाससह दिली गेली आहे. हे स्मार्टवॉचमध्ये कुटूंबाच्या ६ सदस्यांचे नंबर आपण सेव करु शकता. ज्यात आपण मोफत कॉलसुद्धा करु शकता. ह्याचा फायदा हा होईल की. जर तुमचे मुलं तुमच्या जवळपास नसेल, तर आपण ह्या वॉचच्या मदतीने त्याच्याशी संपर्क करु शकता.
त्याशिवाय मुलांचे पालक ह्या स्मार्टवॉचच्या माध्यमातून मुलाचे लोकेशन फिक्स करु शकतात. मुलांच्या प्रीसेट एरिया सोडल्यावर त्याच्या आई-वडिलांना नोटिफिकेशन येते. त्याशिवाय Mi बनी स्मार्टवॉचमध्ये आपतकालीन स्थितीमध्ये एक SoS बटन दिले गेले आहे. जे आई-वडिलांना सिग्नल पाठवतो. अनोळखी व्यक्तींकडून आलेली कॉल ऑटोमॅटिकली रिजेक्ट करतो. हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफसुद्धा आहे. स्मार्टवॉच रोजजी होणारी क्रिया स्वत: रेकॉर्ड करतो. आणि हे रेकॉर्डिंग सलग तीन महिेन्यांपर्यंत केले जाऊ शकते.
हेेदेखील पाहा – लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक
ह्यात एक एलईडी डॉट मॅट्रिक्स डिस्प्ले आहे, जी कॉर्निंग लिक्विड सिलिकॉन स्ट्रॅपसह येते. स्मार्टवॉचमध्ये 300MMH ची बॅटरी ६ दिवसांचा स्टँडबाय टाइम देते. Mi “बनी” स्मार्टवॉच अॅनड्रॉईड 4.2 डिवाइसला सपोर्ट करते. IOS 8 आणि त्यानंतर IOS व्हर्जनला सपोर्ट करते. स्मार्टवॉच निळा आणि गुलाबी रंगात मिळेल.
हेदेखील वाचा – हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे
हेदेखील वाचा – “Make for India” च्या अंतर्गत सॅमसंग केवळ १ रुपयात देत आहे हे स्मार्टफोन्स