Xiaomi Mi Band 3 बद्दल सोशल मीडिया वर आली नवीन माहिती, लवकरच होऊ शकतो सादर
आता काही दिवसांपूर्वी समोर आले होते की कंपनी चे CEO Lei Jun च्या हातात एक नवीन बँड दिसला होता, जो Mi Band 3 असल्याचे बोलले जात होते, आता हा डिवाइस सोशल मीडिया वर टीज करण्यात आला आहे.
आत्ताच समोर आले होते की Xiaomi ने त्यांचा पहिला गेमिंग फोन ब्लॅक शार्क लॉन्च केला आहे, या लॉन्च इवेंट मध्ये आपण बघितले होते की कंपनी चे CEO Lei Jun ने आता पर्यंत लॉन्च न झालेला डिवाइस Mi Band घातला होता, या डिवाइसला Xiaomi Mi Band 3 नाव दिले जात आहे.
काही दिवसांपूर्वी या डिवाइसला चीन च्या ब्लूटूथ सर्टिफिकेशन कडून परवानगी पण मिळाली होती. आता असे समोर येत आहे की हा डिवाइस लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. पण याच्या लॉन्च बद्दल आता पर्यंत जास्त माहिती समोर आली नाही. परंतु एवढे मात्र समोर आले आहे की कंपनी ने एक अधिकृत टीजर मध्ये हा डिवाइस सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. याचा अर्थ असा की कंपनी हा डिवाइस लवकरच लॉन्च करू शकते.
या डिवाइस बद्दल आधी पण माहिती समोर आली आहे. जसे की तुम्ही या विडियो मध्ये बघू शकता की या बँड मध्ये नोटिफिकेशन आणि अन्य फीचर्स स्लाइडिंग अप आणि डाउन च्या माध्यमातून वापरता येतात, म्हणजे एकाच वेळी तुम्ही एकापेक्षा जास्त काम करू शकता. त्याचबरोबर स्क्रीन वर टॅप करून यूजर्स वेगवेगळ्या आइटम्स चा वापर करू शकतात.
तसेच हेही लक्षात असू दे की हा डिवाइस याच्या मागच्या पिढीच्या म्हणजे Xiaomi Mi Band 2 च्या तुलनेत जास्त अपडेट असणार आहे. त्याचबरोबर असे पण समोर येत आहे की या डिवाइस मध्ये एक कलर डिस्प्ले असणार आहे. काही महिन्यांपूर्वी Xiaomi Mi Band 3 डिवाइस ला Bluetooth SIG चे सर्टिफिकेशन मिळाले आहे.