Xiaomi ने आपल्या फिटनेस बँड Mi Smart Band 6 ची किंमत केली आहे. हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग व्यतिरिक्त, मोठा डिस्प्ले, 30 फिटनेस मोड आणि स्ट्रेस मॉनिटरिंग सारखे फीचर्स यात आहेत. कंपनीने हा बँड 10 महिन्यांपूर्वी लाँच केला होता. आता ऑगस्टमध्ये कंपनी Mi Band 7 आणण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात Mi Smart Band 6 ची नवीन किंमत
कंपनीने या फिटनेस बँडच्या किमतीत 500 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर Mi Smartband 6 ची किंमत 2,999 रुपये झाली आहे. लाँचच्या वेळी, या उपकरणाची किंमत 3,499 रुपये होती. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन किंमत देखील अपडेट करण्यात आली आहे. हा बँड फक्त ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : खुशखबर ! Amazonवर नवीनतम रेफ्रिजरेटर्सवर मिळतेय भारी सवलत, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
Xiaomi Mi Smart Band 6 मध्ये 1.56-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले Mi Smart Band 5 पेक्षा 50% मोठा आहे. डिस्प्ले आकर्षक बनवण्यासाठी वॉच फेस देखील कस्टमाइझ केला जाऊ शकतो. यात मॅग्नेटिक चार्जिंगचे फिचर आहे. कंपनीचा दावा आहे की, बँडची बॅटरी दोन आठवडे टिकते. हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग व्यतिरिक्त, यात 30 फिटनेस मोड, महिलांच्या मासिक पाळी सायकल ट्रॅकिंग, झोप आणि स्ट्रेस मॉनिटरिंग यांसारखे फीचर्स आहेत.
बँडच्या फिटनेस मोडमध्ये क्रिकेट, किकबॉक्सिंग, झुंबा, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग, जिम्नॅस्ट, स्विमिंग आणि योग यांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये स्मार्टफोन नोटिफिकेशन, वेदर कंडिशन, कॅलेंडर, म्युझिक प्लेबॅक, इव्हेंट रिमाइंडर यांसारखे फीचर्सही आहेत.