दीर्घकाळ बॅटरी लाइफसह Xiaomi Band 8 बाजारात दाखल, किंमतही कमी

Updated on 19-Apr-2023
HIGHLIGHTS

Xiaomi Band 8 ची सुरुवातीची किमंत अंदाजे 2,800 रुपये

यामध्ये ऑल्वेज ऑन मोड दिला गेला आहे.

डिवाइसमध्ये 190mAhची बॅटरी देण्यात आली आहे, जी तब्बल 16 दिवसांपर्यंत टिकेल.

मागील काही दिवसांपासून Xiaomi Band 8 च्या लाँचबद्दल चर्चा सुरु होत्या. आता अखेर कंपनीचा नवा बँड लाँच झाला आहे. हा बँड चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. यासह, कंपनीने Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन आणि Xiaomi Pad 6 सिरीज देखील लाँच केली आहे. हा बँड लवकरच भारतात लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे. जाणून घेऊयात किंमत – 

Xiaomi Band 8 ची किंमत

कंपनीने Xiaomi Band 8 चे दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहेत. या बँडच्या स्टॅंडर्ड वर्जनची किंमत अंदाजे 2,800 रुपये आहे. तर NFC प्रकाराची किंमत RMB 279 म्हणजेच अंदाजे 3,300 रुपये आहे. 

Xiaomi Band 8

Xiaomi Band 8 मध्ये तुम्हाला 1.6 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यामध्ये ऑल्वेज ऑन मोड दिला गेला आहे. हे बँड 50 मीटरपर्यंत पाण्यात काम करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. स्ट्रॅपसाठी कंपनीने लेदर, वोवन लेदर, होलो ब्रेसलेट आणि टीपीयू स्ट्रॅपचा पर्याय दिला आहे. डिवाइसमध्ये 190mAhची बॅटरी देण्यात आली आहे, जी तब्बल 16 दिवसांपर्यंत टिकेल, असा दावा आहे. यासाठी ऑल्वेज ऑन मोड निष्क्रिय करावा लागेल. 

तसेच, या बँडमधेय बरेच फिटनेस फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, मेन्स्ट्रुअल सायकल ट्रॅकर इ. आरोग्यविषयक फीचर्स मिळतील. याशिवाय, रनिंग आणि बॉक्सिंगसारखे स्पोर्ट्स मोड्सदेखील मिळणार आहेत. बँडमध्ये इनबिल्ट गेम्स सुद्धा आहेत. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :