रन-आऊटसाठी ऍक्शन रिप्लेपासून ते DRS साठी बॉल ट्रॅकिंगपर्यंत, वाढत्या तंत्रज्ञानाने क्रिकेट बघण्याचे अनुभव गेल्या काही वर्षांमध्ये अप्रतिम झाले आहे. आता ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सेमी फायनलदरम्यान, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांसारखे क्रिकेटपटू नवीन विशेष Whoop फिटनेस बँड परिधान केलेले दिसले.
हे सुद्धा वाचा: Lava Agni 2S ‘या’ महिन्यात होणार लाँच, Affordable किमतीत मिळतील अनेक विशेष फीचर्स। Tech News
हे फिटनेस वेअरेबल डिवाइस ‘Whoop’ नावाच्या कंपनीचे आहे. दुर्दैवाने हे उपकरण सध्या भारतात उपलब्ध नाही. हूप फिटनेस बँड परिधान केलेल्या विराट कोहलीच्या फोटोजने सोशल मीडियासह जगभरात खळबळ उडवली आहे.
एवढेच नाही, तर Whoop चे संस्थापक आणि CEO Will Ahmed यांनीही गेल्या महिन्यात भारतीय क्रिकेटपटूंना त्यांचे प्रोडक्ट मैदानावर परिधान करताना पाहिले. त्याबरोबरच, त्यांचे वेअरेबल लवकरच भारतात लाँच केले जाऊ शकते, असे संकेतही अहमद यांनी दिले आहेत.
फिटनेस कंपनी Whoop ने 2015 मध्ये आपला प्रायमरी फिटनेस ट्रॅकर हूप 1.0 सादर केला. कालांतराने हे वेअरेबल विकसित झाले आणि 2021 मध्ये त्याची नवीनतम आवृत्ती Whoop 4.0 रिलीज झाली. Whoop आणि इतर वेअरेबल उपकरणांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे त्याची फिजिकल डिझाईन होय. हूपमध्ये वेअरेबल्समध्ये स्क्रीन दिली जात नाही.
इतर अनेक वेअरेबलसारखे, Whoop ला चार्जिंगसाठी रिमूव्ह करण्याची गरज नाही. हे अद्वितीय फिचर सिरीयस फिटनेस उत्साहींना चार्जिंगसाठी कोणत्याही व्यत्ययाशिवाय दिवसाचे 24 तास त्यांचे मेट्रिक्स सतत ट्रॅक करण्यास मदत करते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, वापरकर्ते त्यांच्या शरीरावर कुठेही हूप घालू शकतात. यासह देखील त्यांना लॅब-स्तरीय अचूक डेटा मिळेल, जो इतर आघाडीच्या वेअरेबलला मागे टाकतो, असा कंपनीचा दावा आहे. Whoop App दैनंदिन परफॉर्मन्स स्कोअर, हेल्थ मेट्रिक्स आणि रिअल-टाइम स्ट्रेस लेव्हल ट्रॅक करतो.
एवढेच नाही तर, अलीकडेच कंपनीने एक नवीन ‘WHOOP Coach’ फिचर लाँच केले आहे, जे रिअल टाइममध्ये उत्तरे देते. हे फिचर OpenAI सह सुसज्ज आहे आणि वापरकर्त्याचा वैयक्तिक WHOOP डेटाचा वापर करतो.