मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या गियर S2 क्लासिक स्मार्टवॉचचे प्रीमियम 18K रोझ गोल्ड आणि प्लॅटिनम व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने गियर S2 व्हाइट व्हर्जनविषयी अशी माहिती दिली आहे की, भारतात ह्याला २४,३०० रुपयाच्या किंमतीत विकले जाईल.
भारतात गियर 2 क्लासिक स्मार्टवॉचचे प्रीमियम 18K रोझ गोल्ड आणि प्लॅटिनम व्हर्जनची किंमत ३४,९०० रुपये असेल. नवीन मॉडलशिवाय सॅमसंग गियर S2 आणि सॅमसंग गियर S2 क्लासिक स्मार्टवॉचसाठी अॅप आणि डाईलसुद्धा लाँच केली आहे.
सॅमसंग गियर S2 प्लॅटिनम आणि रोझ गोल्ड वेरियंटमध्ये डाईल आणि बक्कल एकसारखे आहेत. ह्या नवीन वेरियंटमध्ये लेदर स्ट्रेप दिले गेली आहे, ज्यात रोझ गोल्डसाठी व्हाइट आणि प्लॅटिनमसाठी ब्लॅक स्ट्रेप उपलब्ध आहेत. दोन्हीही स्ट्रेनचा आकार 20mm आहे.
सॅमसंग गियर S2 च्या नवीन वेरियंटमध्ये हेल्थ, फिटनेस आणि कनेक्टिव्हिटी आणि स्टाइलवरसुद्धा लक्ष दिले गेले आहे. ह्यात ट्विटर आणि इंस्टाग्रामशिवाय व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचासुद्धा उपयोग केला जाऊ शकतो. ह्या नवीन प्रकारात पझल गेम हॅक्सट्रिक्स, क्लासिक कार रेसिंग गेम वीरुम रायडरशिवाय हंगामा आणि प्ले स्टोरचे लोकप्रिय गेम स्पेस वॉर्स आणि स्नॅकसुद्धा सामील आहेत.
तर सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.2 इंचाची सर्क्युलर डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 360×360 पिक्सेल आहे. ह्यात 1GHz ड्यूल कोर प्रोसेसर आणि 512MB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. हा डिवाइस 4GB अंतर्गत स्टोरेजसह येते.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, वायफाय आणि NFC दिले गेले आहेत. सॅमसंग गियर S2 धूळीपासून आणि पाण्यापासून संरक्षित आहे. ह्यात 250mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
टायजन ऑपरेटिंग सिस्टम आधारित गियर S2 स्मार्टवॉचचे प्रदर्शन सॅमसंगने IFA 2015 दरम्यान केले होते.
हेदेखील वाचा – १००० च्या किंमतीत येणारे सर्वोत्कृष्ट हेडफोन्स
हेदेखील वाचा – ३१ मार्चला भारतात लाँच होईल शाओमी Mi 5 स्मार्टफोन