सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉच भारतात लाँच

Updated on 21-Jan-2016
HIGHLIGHTS

भारतामध्ये गियर S2 स्मार्टवॉचची किंमत २४,३०० रुपयांपासून २५,८०० रुपयापर्यंत ठेवण्यात आली आहे. हे २१ फेब्रुवारीपासून सॅमसंगच्या सर्व रिटेल चॅनल्सवर उपलब्ध होईल. त्याचबरोबर कंपनीने GearVR सुद्धा सादर केला आहे, ज्याची किंमत ८२०० रुपये आहे.

मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने आज भारतात आपली नवीन स्मार्टवॉच गियर S2 सादर केली आहे. भारतात ह्याची किंमत २४,३०० रुपयांपासून २५,८०० रुपयापर्यंत ठेवण्यात आली आहे. हे २१ फेब्रुवारीपासून सॅमसंगच्या सर्व रिटेल चॅनल्सवर उपलब्ध होईल. त्याचबरोबर कंपनीने GearVR सुद्धा सादर केला आहे, ज्याची किंमत ८२०० रुपये आहे.

 

हा डिवाइस गियर S2 आणि गियर S2 क्लासिक अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. सॅमसंग गियर S2  आणि गियर S2 क्लासिकचे स्पेसिफिकेशनमध्ये काही विशेष अंतर नाही. खरा फरक ह्याचे डिझाइनच आहे. इतर सर्व फीचर सारखे आहेत.

सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्याचा आकार गोलाकार आहे. त्याचबरोबर ह्याला रोटेटिंग बेजलसह लाँच केले गेले आहे. रोटेट बेजलच्या माध्यमातून मेन्यू, अॅप्स आणि फीचर अगदी सहजरित्या ओपन करुन त्याचा वापर केला जाऊ शकतो.

सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.2GHz इंचाची सर्कुलर डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 360×360 पिक्सेल आहे. ह्यात 1GHz ड्यूल कोर प्रोसेसर आणि 512MB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. हा डिवाइस 4GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येतो.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, वायफाय आणि NFC दिले गेले आहे. सॅमसंग गियर S2 धूळ आणि पाणी अवरोधक आहे. ह्यात 250mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

टायझन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित गियर S2 स्मार्टवॉचचे प्रदर्शन सॅमसंगने IFA 2015 च्या दरम्यान केले होते. त्याचबरोबर गियर व्हीआरहेडसेटचेसुद्धा प्रदर्शन केले जाऊ शकते.

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :