मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी सॅमसंग २१ जानेवारीला भारतात आपले नवीन स्मार्टवॉच गियर S2 सादर करेल. सॅमसंगने आपल्या ह्या डिवाइसच्या लाँचसाठी मिडिया निमंत्रणसुद्धा पाठवले आहे. ह्या मिडिया निमंत्रणाता गियर S2 चा फोटो स्पष्ट पाहू शकता.
कंपनी ह्या डिवाइसला २१ जानेवारीला सादर करेल. हा डिवाइस गियर S2 आणि गियर S2 क्लासिक अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. सॅमसंग गियर S2 आणि गियर S2 क्लासिकचे स्पेसिफिकेशनमध्ये काही विशेष अंतर नाही. खरा फरक ह्याचे डिझाईनच आहे. इतर सर्व फीचर सारखे आहेत.
सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्याचा आकार गोलाकार आहे. त्याचबरोबर ह्याला रोटेटिंग बेजलसह लाँच केले गेले आहे. रोटेट बेजलच्या माध्यमातून मेन्यू, अॅप्स आणि फीचर अगदी सहजरित्या ओपन करुन त्याचा वापर केला जाऊ शकतो.
सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.2GHz इंचाची सर्कुलर डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 360×360 पिक्सेल आहे. ह्यात 1GHz ड्यूल कोर प्रोसेसर आणि 512MB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. हा डिवाइस 4GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, वायफाय आणि NFC दिले गेले आहे. सॅमसंग गियर S2 धूळ आणि पाणी अवरोधक आहे. ह्यात 250mAh ची बॅटरी दिली गेली आहे.