ऍडव्हान्स हेल्थ फीचर्ससह Samsung Galaxy Watch 7 आणि Watch Ultra भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 

ऍडव्हान्स हेल्थ फीचर्ससह Samsung Galaxy Watch 7 आणि Watch Ultra भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Unpacked Event मध्ये कंपनीने लेटेस्ट स्मार्टवॉच सादर केले.

कंपनीने Samsung Galaxy Watch 7 आणि Galaxy Watch Ultra स्मार्टवॉच भारतात लाँच केले.

दोन्ही स्मार्टवॉचेसवर ग्राहकांना तब्बल 8,000 रुपयांची सूट मिळत आहे.

10 जुलै 2024 रोजी साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताचा मेगा इव्हेंट Samsung Galaxy Unpacked Event पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन उपकरणे सादर केली आहेत. कंपनीने आपले नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स Samsung Galaxy Fold 6 आणि Flip 6 लाँच केले. यासह कंपनीने Samsung Galaxy Watch 7 आणि Galaxy Watch Ultra स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहेत. कंपनीच्या गॅलेक्सी वॉच मालिकेतील हे पहिले अल्ट्रा मॉडेल आहेत. जाणून घेऊयात Samsung Galaxy Watch 7 आणि Galaxy Watch Ultra ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Samsung Galaxy Watch 7 आणि Watch Ultra ची किंमत

Samsung Galaxy Watch 7 च्या 40mm मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. तर, 40mm LTE मॉडेलची किंमत 33,999 रुपये आहे. 44mm मॉडेलची किंमत 32,999 रुपये आहे, तर त्याच्या LTE व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

तर, दुसरीकडे Samsung Watch Ultra 47mm मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे. अल्ट्रा मॉडेलचे 47mm मॉडेल टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये येते. दोन्ही स्मार्टवॉच प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 8,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. तर, Galaxy Watch Ultra वर तब्बल 10,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

Samsung Galaxy Watch 7 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Watch 7 मध्ये सादर केलेले डायल साईज 40mm आणि 44mm आहेत. 40mm मॉडेलमध्ये तुम्हाला 1.3 इंच लांबीचा डिस्प्ले आणि 300mAh बॅटरी मिळेल. तर, 44mm मॉडेलमध्ये 1.5 इंच लांबीचा डिस्प्ले आणि 425mAh बॅटरी मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये बेस मॉडेल 3nm Exynos W1000 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज प्रदान केले आहे.

आरोग्य आणि फिटनेससाठी यात हार्ट रेट, ऑक्सिजन आणि स्लीप मॉनिटर सेन्सर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, वॉचमध्ये अनेक वर्कआउट मोड देखील देण्यात आले आहेत. तुमच्या झोपेचे निरीक्षण करण्यासाठी Samsung Galaxy Watch 7 मध्ये AI अल्गोरिदम सिस्टम आहे.

Samsung Galaxy Watch Ultra
#Samsung Galaxy Watch Ultra

Samsung Galaxy Watch Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Watch Ultra 47mm डायल सह सादर करण्यात आला आहे. या घड्याळात 1.5 इंच लांबीचा सुपर AMOLED ऑल्वेज ऑन डिस्प्ले आहे. यासह तुम्हाला 3nm Exynos W1000 प्रोसेसर, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळेल. या स्मार्टवॉचला पाण्याच्या संरक्षणासाठी 10ATM रेटिंग देण्यात आली आहे.

आरोग्य आणि फिटनेसाठी यात Galaxy Watch 7 सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला मल्टी स्पोर्ट्स फीचर मिळेल. स्मार्टवॉचमध्ये 590mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये तुम्हाला WPC सपोर्ट मिळेल. पॉवर सेव्हिंग मोडवर ही वॉच तब्बल 100 तास चालेल, असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo