साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक जायंट कंपनी Samsung ने Samsung Galaxy Ring भारतीय बाजारात लाँच केली आहे. या स्मार्ट रिंगसाठीचे प्री-बुकिंग आधीच सुरू झाले आहे. लक्षात घ्या की, ग्राहक फक्त 1,999 रुपये भरून हे डिवाइस प्री-आरक्षित करू शकतात. त्यानंतर, आज म्हणजेच 16 ऑक्टोबर 2024 रोजी रिंग भारतीय बाजारात दाखल झाली आहे. रिंगची विक्री आजपासून सुरू होणार आहे.
कंपनीने हे स्मार्ट रिंग अनेक साईजमध्ये लाँच केले आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी कंपनीने याला IP68 रेटिंग दिली आहे. जाणून घ्या या स्मार्ट रिंगची किंमत आणि सर्व फीचर्स जाणून घेऊयात-
नव्या Samsung Galaxy Ring ची किंमत 38,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही रिंग Flipkart, Amazon आणि Samsung.com वरून खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung Galaxy Ring टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम गोल्ड फिनिश या कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आली आहे.
जागतिक स्तराप्रमाणे Samsung Galaxy Ring भारतातही 5 ते 13 या आकारात सादर करण्यात आली आहे. सॅमसंगने असेही सांगितले की, जे ग्राहक त्यांच्या रिंग साईजबद्दल गोंधळले आहेत ते गॅलेक्सी रिंग खरेदी करण्यापूर्वी फिट तपासण्यासाठी एक साइझिंग किटदेखील खरेदी करू शकतात. Samsung Galaxy Ring मध्ये टायटॅनियम कंस्ट्रक्शन, 10ATM रेटिंग आणि IP68 रेटिंग आहे.
Samsung ने सांगितले की, जागतिक प्रकाराप्रमाणे Samsung Galaxy Ring च्या भारतीय आवृत्तीमध्ये आरोग्य AI क्षमता असेल, ज्याचा वापर वापरकर्त्यांच्या एनर्जी लेवल, स्लीप स्टेज, एक्टिविटी, हार्ट रेट, स्ट्रेस लेवल इ. वर लक्ष ठेवता येईल. हे जेश्चर कंट्रोल आणि सॅमसंगच्या SmartThings Find फिचरला देखील सपोर्ट करेल.
एवढेच नाही तर, Samsung ने Galaxy AI सह Galaxy Ring देखील सादर केली आहे. यामध्ये ‘हेल्थ AI’ फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा सर्व डेटा आणि माहिती सॅमसंग हेल्थ ॲपवर उपलब्ध आहे. कंपनीने यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता नसल्याचे देखील सांगितले आहे. ही रिंग पूर्ण चार्ज झाल्यावर सात दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते.