26 फेब्रुवारी म्हणजेच कालपासून बार्सिलोनामध्ये सुरू झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) ट्रेड शोमध्ये आतापर्यंत अनेक अनोखे आणि नवीन गॅझेट्स सादर करण्यात आले आहेत. या मेगा इव्हेंटमध्ये Samsung ने आपली पहिली स्मार्टफोन रिंग Samsung Galaxy Ring लाँच केली आहे. ही स्मार्ट रिंग तीन कलर व्हेरियंट आणि वेगवेगळ्या आकारात दाखवली गेली आहे. या वर्षाच्या अखेरीस ही अंगठी लाँच केली जाऊ शकते.
हे सुद्धा वाचा: नुकतेच लाँच झालेला Vivo Y200e 5G ची पहिली विक्री आजपासून सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स। Tech News
कंपनीने सांगितले की, Samsung Galaxy Ring हे नवीन हेल्थ फॉर्म फॅक्टर म्हणून सादर केले जाईल. त्याबरोरबच, सॅमसंग हेल्थ प्लॅटफॉर्मशी जोडले जाईल, जे आधीच्या अहवालानुसार सुधारित आणि आधुनिक केले जाणार आहे, असे देखील सांगितले जात आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Samsung Galaxy Ring तीन आकारामध्ये लाँच करण्यात आली आहे. सर्वात लहान आकाराच्या रिंगमध्ये 14.5 mAh बॅटरी आहे. तर, सर्वात मोठ्या आकाराच्या बॅटरीमध्ये 21.5 mAh पर्यंत असते. Galaxy Ring यूएस रिंग 5 – 13 आकारात ऑफर केली जाते, जी रिंगच्या आतील बाजूस S ते XL चिन्हांकित केली जाईल. सॅमसंग गॅलेक्सी रिंग सिरॅमिक ब्लॅक, प्लॅटिनम सिल्व्हर आणि गोल्ड या कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली आहे. Samsung Galaxy Ring ची नेमकी किंमत अद्याप समोर आलेली नाही.
रिंगच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलयचे झाल्यास, ही रिंग तुमच्या हृदयाचे ठोके, झोप आणि श्वासोच्छ्वास असे अनेक हेल्थ विषयक फीचर्ससह येते. लक्षात घ्या की, Samsung Galaxy Ring सध्या फक्त गॅलेक्सी वॉच आणि विद्यमान सॅमसंग हेल्थ इकोसिस्टमसह जोडली जाऊ शकते. सुरुवातीला हे Samsung Galaxy स्मार्टफोनसोबत जोडले जाऊ शकते. परंतु, भविष्यात ही रिंग Android आणि iOS उपकरणांशीही जोडली जाईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.