प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे वेअरेबल प्रोडक्ट्सदेखील स्मार्टफोन्स इतकेच लोकप्रिय आहेत. अलीकडेच कंपनीच्या आगामी Realme Watch S2 चे डिझाईन लीक झाले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे नवीन स्मार्टवॉच दोन वर्षांच्या अंतरानंतर ब्रँडच्या वेअरेबल लाइनअपचे पुनरागमन करतर आहे. मात्र, यापूर्वी अशी अफवा होती की, Realme Watch S2 स्मार्टवॉच 30 जुलै रोजी लाँच केली जाणार आहे. परंतु आता कंपनीने अधिकृतपणे स्मार्टवॉचची पुष्टी केली आहे.
Realme च्या अधिकृत वेबसाइटवर आगामी Realme 13 Pro सिरीजची लाँच डेट उघड झाली आहे. हे नवीन स्मार्टफोन 30 जुलै 2024 रोजी भारतात दाखल होणार आहे. आता हे समोर आले आहे की, या स्मार्टफोन सीरिजसोबत Realme Watch S2 ची देखील घोषणा होणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हे आगामी डिव्हाइस ओरिजनल Realme Watch S चे उत्तराधिकारी म्हणजेच सक्सेसर आहे. याशिवाय, नवीन स्मार्टवॉचच्या टीझर पोस्टरमध्ये त्याची काही खास फीचर्सही समोर आली आहेत.
Realme Watch S2 बद्दल बोलायचे झाल्यास, ही वॉच AI व्हॉईस असिस्टंटसह येईल जो ChatGPT ने सुसज्ज आहे. या स्मार्टवॉचच्या डिझाईनची झलक देखील मिळाली आहे. ज्यामध्ये स्मार्टवॉचचा गोलाकार डिस्प्ले दिसत आहे. तसेच, स्क्रीन सोनेरी रिमने वेढलेली दिसत आहे, जी Realme 13 Pro सिरीजच्या मोनेट गोल्डशी संबंधित आहे. या वॉचमध्ये शक्यतो नेव्हिगेशन आणि कार्यक्षमतेसाठी दोन बटणे उजव्या बाजूला देखील दिसू शकतात.
ही स्मार्टवॉच मॉडेल क्रमांक RMW2401 सह FCC डेटाबेसवर दिसली होती. यावरून डिव्हाइसचा डिजिटल क्राउन आणि मेटल लिंक स्ट्रॅप उघड झाले. कंपनी यावेळी या स्मार्टवॉचचा एकच प्रकार रिलीज करेल अशी शक्यता आहे. FCC ने 380mAh बॅटरीसह डिव्हाइस सूचीबद्ध केले आहे, जे 5W चार्जिंगला समर्थन देते. रिलीझची तारीख जवळ आल्यावर अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.