Realme Watch 3 Pro : स्मार्टवॉचची लाँच डेट कन्फर्म, उत्तम फीचर्ससह सुसज्ज, वाचा डिटेल्स

Realme Watch 3 Pro : स्मार्टवॉचची लाँच डेट कन्फर्म, उत्तम फीचर्ससह सुसज्ज, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Realme Watch 3 Pro 6 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार

नव्या स्मार्टवॉचची किंमत 4,000 रुपयांपेक्षा कमी

या वॉचमध्ये 110 पेक्षा जास्त फिटनेस मोड उपलब्ध

Realme Watch 3 Pro 6 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे, ब्रँडने ट्विटरद्वारे याची पुष्टी केली आहे. नवीन वेअरेबल Realme Watch 3 चे अपग्रेडेड वर्जन म्हणून येण्याची अपेक्षा आहे आणि त्यात AMOLED डिस्प्ले असेल. स्मार्टवॉचसाठी समर्पित मायक्रोसाइट देखील Realme च्या वेबसाइटवर लाईव्ह आहे. याशिवाय Realme Watch 3 Pro चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक झाले आहेत. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, वॉचची स्क्रीन 368 x 448 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.78 इंच आहे.

हे सुद्धा वाचा : 15 हजारांच्या आत येणाऱ्या Redmi Note 11SE ची पहिली विक्री आज , 'अशा'प्रकारे फक्त 599 रुपयांना खरेदी करा

टीझर पोस्टरनुसार, Realme Watch 3 Pro चे लॉन्चिंग 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. ग्राहक लॉन्चबद्दल लेटेस्ट अपडेट्स मिळविण्यासाठी वेबसाइटवरील "Notify Me" बटनवर क्लिक करू शकतात.

 

 

Realme Watch 3 Pro ची अपेक्षित किंमत

नवीनतम Realme Watch 3 Pro हे Realme Watch 3 चे अपग्रेड असल्याचे सांगितले जाते. जे 2,999 रुपयांना लॉन्च केले गेले होते. नवीन वेअरेबल रियलमी वॉच 3 पेक्षा थोडे अधिक महाग असू शकते. वॉच 3 प्रो 4,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार, अशी अपेक्षा आहे.

Realme Watch 3 Pro चे संभाव्य फीचर्स 

ही वॉच आयताकृती डिझाइनसह येईल. घड्याळ अनेक कलर ऑप्शन्समध्ये येण्याची शक्यता आहे. नेव्हिगेशनसाठी साइड-माउंट केलेले बटण आहे. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील मिळण्याची अपेक्षा आहे,  ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या मनगटावरून थेट कॉल रिसिव्ह आणि डायल करता येईल. 

त्याबरोबरच, Realme Watch 3 मध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि 240×286 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.8-इंच TFT-LCD टच स्क्रीनची फीचर्स आहेत. डस्ट आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हे स्मार्टवॉच IP68 रेट केलेले आहे. वॉचमध्ये हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग, स्टेप आणि स्लीप ट्रॅकिंगसाठी सेन्सर आहेत आणि वर्कआउट ट्रॅकिंगसाठी 110 पेक्षा जास्त फिटनेस मोड आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo