Realme Watch 3 Pro भारतात लाँच झाली आहे. कंपनीचे हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह येते. आरोग्य आणि फिटनेससाठीही कंपनी यामध्ये अनेक सेन्सर्स देत आहे. या स्मार्टवॉचची किंमत 4,499 रुपये आहे. ब्लॅक आणि ग्रे कलर ऑप्शनमध्ये येत असलेल्या या वॉचची विक्री 9 सप्टेंबरपासून सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त तुम्हाला ते फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करता येईल.
हे सुद्धा वाचा : Jio 84 days plan : तुम्हाला Airtel आणि Vi पेक्षा खूप कमी किमतीत मिळतील आकर्षक बेनिफिट्स
स्मार्टवॉच व्यतिरिक्त कंपनीने Buds Air 3S देखील लॉन्च केला आहे. 30 तासांपर्यंत बॅटरी लाइफ असलेल्या या बड्सची किंमत 2,499 रुपये आहे. या बड्सची विक्री 14 सप्टेंबरपासून Amazon India, Realime Store आणि कंपनीच्या वेबसाइटवर सुरू होईल.
कंपनीचे हे लेटेस्ट स्मार्टवॉच 1.78-इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह येते. स्मार्टवॉच ऑल्वेज ऑन डिस्प्ले फिचरसह सुसज्ज आहे. वॉच आयताकृती डायल आणि 22 मिमीच्या रिमूव्हेबल स्ट्रॅपसह येते. त्याबरोबरच, ही वॉच ब्लूटूथ कॉलिंग देखील ऑफर करते. ही वॉच उत्कृष्ट कॉलिंग एक्सपेरियन्ससाठी हाय-परफॉर्मन्स स्पीकर, इनबिल्ट स्मार्ट पॉवर ऍम्प्लिफायर आणि AI नॉईज कॅन्सलेशनसह येईल.
हेल्थ ट्रॅकिंगसाठी, कंपनी यात 24×7 हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 ब्लड ऑक्सिजन सेन्सर प्रदान करत आहे. याशिवाय या वॉचमध्ये तुम्हाला 100 हून अधिक स्पोर्ट्स मोडही मिळतील. कंपनी वॉचमध्ये 345mAh बॅटरी देत आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 10 दिवस चालते असा कंपनीचा दावा आहे.
दमदार साउंडसाठी, रिअॅलिटीच्या इन-इअर स्टाइल डिझाइनसह या TWS बड्सना 11mm लिक्विड सिलिकॉन ट्रिपल टायटॅनियम बास ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. डॉल्बी ATMOSला सपोर्ट करत, बड्स AAC हाय-कॉलिटीच्या ऑडिओला देखील सपोर्ट करतात. बेस ब्लॅक आणि बेस व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या बड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.3 देण्यात आला आहे.