Rakshabandhan Gift Ideas: कमी किमतीत खरेदी करा ‘या’ प्रीमियम स्मार्टवॉच, गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन्स

Rakshabandhan Gift Ideas: कमी किमतीत खरेदी करा ‘या’ प्रीमियम स्मार्टवॉच, गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन्स
HIGHLIGHTS

प्रीमियम स्मार्टवॉच तुम्ही Amazon वरून 12 हजार रुपयांअंतर्गत खरेदी करू शकता.

Fossil Gen 5E स्मार्टवॉच Amazon वर 35% सूटसह उपलब्ध

कोटक बँक कार्डद्वारे, ग्राहकांना या वॉचेसवर 1,250 रुपयांपर्यंतची सूट

मित्रांनो! रक्षाबंधन उद्यावर आलंय आणि अजूनही तुम्ही तुमच्या बहिणीला काय गिफ्ट द्यावं हे ठरवलं नाही?  काळजी करू नका आम्ही तुमची ही चिंता देखील मिटवू. तुम्ही तुमच्या बहिणीला प्रीमियम फीचर्स असलेले स्मार्टवॉच भेट देऊ शकता. खरं तर, अनेक प्रीमियम श्रेणीतील स्मार्टवॉचेस Amazon वर अप्रतिम डिल्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहेत. हे प्रीमियम स्मार्टवॉच तुम्ही Amazon वरून 12 हजार रुपयांअंतर्गत खरेदी करू शकता. चला तर मग बघुयात प्रीमियम स्मार्टवॉचेसची यादी. 

Amazfit GTS 2

Amazfit GTS 2 मध्ये 1.65 इंच डिस्प्ले आहे. यात 3GB स्टोरेज मिळते. तसेच, ही वॉच ब्लूटूथ कॉलिंग फिचरसह येते, ज्यामध्ये इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन आहे. तसेच, स्मार्टवॉचमध्ये अलेक्सा सपोर्टही देण्यात आला आहे.

Amazon साइट Amazfit GTS 2 स्मार्टवॉच 53% सूटसह केवळ 7,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला यासोबत 384 रुपयांचा EMI पर्यायही मिळत आहे. कोटक बँक कार्डद्वारे, ग्राहकांना या वॉचवर 1,250 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळेल. येथून खरेदी करा 

rakshabandhan gift ideas

Samsung Galaxy Watch4

सॅमसंग वॉचमध्ये 1.4-इंच लांबीचा डिस्प्ले मिळतो. यात 16GB स्टोरेज देखील मिळेल. वॉचमध्ये 90 पेक्षा जास्त वर्कआउट मोड, हार्ट रेट सेन्सर सारखी हेल्थ फीचर्स उपलब्ध आहेत. ही वॉच एका चार्जवर 40 तासांपर्यंत चालेल, असा दावा देखील केला जातो.

Amazon वरून ही वॉच 11,990 रुपयांना 56 टक्के डिस्काउंट ऑफरसह खरेदी करता येईल. तुम्ही दरमहा 576 रुपये भरून EMI ऑप्शनद्वारे देखील वॉच खरेदी करू शकता. बँक ऑफर्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. कोटक बँकेच्या कार्डद्वारे या घड्याळावर 1250 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. येथून खरेदी करा

Fossil Gen 5E Smartwatch

Fossil Gen 5E Smartwatch अँड्रॉइड आणि iPhone दोन्ही उपकरणांशी कनेक्ट केले जाऊ शकते. यात 1.19-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 390×390 पिक्सेल आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 4.2, NFC, Wi-Fi सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वॉचमध्ये 3ATM रेटिंग देखील देण्यात आली आहे.

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Fossil Gen 5E स्मार्टवॉच Amazon वरून 11,995 रुपयांना 35% सूट देऊन खरेदी करता येईल. तुम्ही ही स्मार्टवॉच 576 रुपयांच्या प्रारंभिक EMI द्वारे देखील खरेदी करू शकता. इतकेच नाही तर कोटक बँकेच्या कार्डद्वारे या स्मार्टवॉचवर 1,250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. येथून खरेदी करा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo