Pebble चे नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळेल मोठा 1.85-इंच लांबीचा डिस्प्ले आणि बरेच काही
Pebble Spark Ace पॉकेट फ्रेंडली स्मार्टवॉच भारतात लाँच
नवीनतम स्मार्टवॉच फक्त 1699 रुपयांमध्ये लॉन्च
फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध - बिग बिलियन डेज सेल रु. 1499 मध्ये
देशांतर्गत कंपनी Pebble ने आपले नवीन स्मार्टवॉच Pebble Spark Ace भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे. Pebble Spark Ace ची सुरुवातीची किंमत रु. 1,699 लाँच करण्यात आली आहे. पण Flipkart वर चालणार्या बिग बिलियन डेज सेलमध्ये ही वॉच 1,499 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. Pebble Spark Ace मध्ये 1.85-इंचाचा HD डिस्प्ले आहे.
हे सुद्धा वाचा : Amazon सेलमधील आजच्या सर्वोत्तम डीलमध्ये 'हे' लॅपटॉप आणि स्मार्टवॉच, बघा ऑफर्स
Pebble Spark Ace चे फीचर्स
Pebble Spark Ace च्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या वॉचच्या डिस्प्लेची ब्राइटनेस 500 nits आहे. यामध्ये फोनवर येणार्या सर्व नोटिफिकेशन्स देखील मिळतील, मात्र यामध्ये कॉलिंगची सुविधा देण्यात आलेली नाही.
त्याबरोबरच, पेबल स्पार्क एसमध्ये इनबिल्ट गेम्स देखील दिले गेले आहेत आणि या वॉचमधून तुम्ही फोनवरील म्युझिक कंट्रोल करू शकता आणि कॅमेरा देखील नियंत्रित करू शकता. पेबल स्पार्क ऐसच्या बॅटरीबाबत 10 दिवसांपर्यंतच्या बॅकअपचा दावा करण्यात आला आहे.
हेल्थ फीचर्स म्हणून, पेबल स्पार्क Ace ला स्पोर्ट्स मोड, SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर, ब्लड प्रेशर सेन्सर आणि स्टेप काउंटर मिळेल. या पेबल वॉचसह 100 हून अधिक वॉच फेस उपलब्ध आहेत. पेबल स्पार्क एस मिडनाईट ब्लॅक, मिंट ग्रीन आणि आयव्हरी गोल्ड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile