तुम्ही नवीन स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आता नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. भारतीय ब्रँड Pebble ने आपले नवीन स्मार्टवॉच Pebble Cosmos Max भारतात लाँच केले आहे. कंपनीचे हे नवीन स्मार्टवॉच 1.81 इंच साईजच्या डिस्प्लेमध्ये आहे. सेगमेंटमधील हे पहिले स्मार्टवॉच आहे, ज्यामध्ये ऑटो स्पीकर क्लीनर फीचर दिले जात आहे.
हे सुद्धा वाचा : Top 5 Upcoming Movies : 300 कोटींपेक्षा जास्त बजेटमध्ये तयार करण्यात आले आहेत 'हे' चित्रपट, पहा यादी
या स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे. ही एक इंट्रोडक्टरी प्राईस आहे, लाँच ऑफर संपल्यानंतर त्याची किंमत 6,999 रुपये असेल. हे स्मार्टवॉच Amazon India वरून 4,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी केले जाऊ शकते. येथून खरेदी करा…
कंपनीस्मार्टवॉचच्या खरेदीवर 1,500 रुपयांपर्यंत रिवॉर्ड देखील देत आहे. याशिवाय तुम्ही Amazon Pay ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 3% कॅशबॅक देखील मिळेल. कोबाल्ट ब्लू, जेट ब्लॅक, मिडनाईट गोल्ड आणि मिंट कलर ऑप्शन्समध्ये तुम्ही ही वॉच Amazon India वरून खरेदी करू शकता. वॉचमध्ये, तुम्हाला हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर्ससह ब्लड प्रेशर मॉनिटर सिस्टम देखील मिळेल.
कंपनी या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.81-इंच लांबीचा स्क्वेअर डायल डिस्प्ले देत आहे. कॉसमॉस सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेला हा सर्वात मोठा डिस्प्ले असल्याचा कंपनीचा दावा आहे. स्मार्टवॉचची बॉडी झिंक अलॉयने बनलेली आहे, ज्यामुळे त्याचा लूक खूपच प्रीमियम होतो. वॉचमध्ये क्राउन रोटेशन बटन देखील आहे. पेबल कॉसमॉस मॅक्स AI व्हॉईस असिस्टंटसह येते.
यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ 5.1 कॉलिंग फीचर देखील मिळेल. आरोग्य आणि फिटनेससाठीही या वॉचमध्ये अनेक महत्त्वाचे आणि उपयुक्त फिचर्स देण्यात आले आहेत. ही वॉच ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सिजन आणि हार्ट रेट सेन्सरने सुसज्ज आहे. यामध्ये कंपनी महिलांचे आरोग्य आणि स्लीप ट्रॅकिंग फीचर देखील देत आहे.
कंपनीच्या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 100 स्पोर्ट्स मोड पर्याय मिळतील. स्मार्टवॉच वापरकर्त्याच्या व्यायामाचा डेटा रेकॉर्ड देखील ट्रॅक करते. यामध्ये तुम्हाला डू नॉट डिस्टर्ब, रेज टू वेक आणि ऑल डे हार्ट रेट टेस्ट फीचर देखील मिळेल. कंपनी वॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस देखील देत आहे. तुम्ही वॉचला फोनसोबत पेयर करून म्युझिक कंट्रोल देखील करू शकता.