घरगुती ब्रँड पेबलने आपले नवीन स्मार्टवॉच पेबल कॉसमॉस बोल्ड लाँच केले आहे. पेबल कॉसमॉस बोल्ड हे ऍडवान्स ब्लूटूथ कॉलिंग फिचरसह येते. याशिवाय त्यात हिंदीचाही आधार घेण्यात आला आहे. पेबल कॉसमॉस बोल्डसह राउंड मेटॅलिक डायल उपलब्ध आहे. जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्स…
हे सुद्धा वाचा : Microsoft लवकरच ChatGPT-4 लाँच करणार, जाणून घ्या काय असेल नवीन ?
पेबल कॉसमॉस बोल्डची विक्री फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या साइटवरून सुरू झाली आहे. त्याची किंमत 2,299 रुपये ठेवण्यात आली आहे. ही वॉच जेट ब्लॅक, मिडनाईट गोल्ड, विंटर ब्लू आणि मिस्टी ग्रे कलरमध्ये सादर करण्यात आली आहे.
Pebble Cosmos Bold मध्ये 1.39-इंच लांबीचा अल्ट्रा HD IPS डिस्प्ले आहे, ज्यामुळे सूर्यप्रकाशात कोणतीही समस्या होणार नाही. याशिवाय स्मार्टवॉचची डिझाईन देखील स्टायलिश आहे. पेबल कॉसमॉस बोल्डमध्ये इनबिल्ट स्पीकर, मायक्रोफोन आणि कॉलिंगसाठी कीपॅड आहे.
यात पेबल झेन मोड देखील आहे, जो वापरकर्त्यांना रिलॅक्स करण्यासाठी आहे. पेबलच्या वॉचमध्ये 100 हून अधिक ऍक्टिव्ह स्पोर्ट्स मोड आहेत. 24/7 आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी पेबल कॉसमॉस बोल्डमध्ये हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर यांसारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.