लोकप्रिय ब्रँड OnePlus लवकरच भारतात OnePlus Watch 2 लाँच करणार आहे. ही वॉच OnePlus Watch ची सक्सेसर असेल. वनप्लस वॉच 2 कधी लाँच होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण काही फीचर्स लीक झाले आहेत. हे वॉच BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहिले गेले आहे. चला तर मग आगामी वॉचबद्दल पुढे आलेले डिटेल्स सविस्तरपणे बघुयात.
मिळालेल्या रिपोर्टनुसार रिपोर्टनुसार, OnePlus Watch 2 2024 मध्ये लाँच करण्यात येईल. ही वॉच कंपनीच्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज OnePlus 12 सह सादर केले जाण्याची शक्यता आहे.
या स्मार्टवॉचचा डिस्प्ले गोलाकार आहे. लक्षात घ्या की, वनप्लस वॉचच्या तुलनेत यात काही महत्त्वाचे अपग्रेड्स दिले जाऊ शकतात. आधीच्या मॉडेलप्रमाणे, या नवीन स्मार्टवॉचमध्ये देखील कस्टम RTOS प्लॅटफॉर्म असणे अपेक्षित आहे. हे Android आणि iOS सपोर्टसह ऑफर केले जाऊ शकते. ही स्मार्टवॉच उत्तम आरोग्य फीचर्ससह येऊ शकते. यासोबतच अनेक अपग्रेडेड फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. यामध्ये अनेक ट्रॅकिंग फीचर्स असतील.
OnePlus Watch ची किंमत भारतात 16,999 रुपये इतकी आहे. ही वॉच मिडनाईट ब्लॅक आणि मूनलाईट सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हे कोबाल्ट लिमिटेड एडिशन म्हणून देखील सादर केले गेले. स्मार्टवॉचला डस्ट आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, ही वॉच कंपनीच्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज OnePlus 12 सह सादर केली जाऊ शकते. OnePlus 12 मध्ये LYTIA ड्युअल-लेयर स्टॅक केलेला CMOS सेन्सर प्रदान केला जाईल. हा सेन्सर प्रकाश अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करेल. तसेच, OnePlus 12 मध्ये Sony IMX966 50MP सेन्सर, अल्ट्रा-वाइड टेलीफोटो लेन्ससह 48MP सेन्सर आणि 3x ऑप्टिकलसह 64MP OmniVision OV64B सेन्सर असल्याचे सांगण्यात आले.