OnePlus चे पहिले स्मार्टवॉच झाले स्वस्त, आरोग्य आणि फिटनेसचे निरीक्षण करण्यासाठी सर्वोत्तम डिवाइस

OnePlus चे पहिले स्मार्टवॉच झाले स्वस्त, आरोग्य आणि फिटनेसचे निरीक्षण करण्यासाठी सर्वोत्तम डिवाइस
HIGHLIGHTS

OnePlus Watch च्या किमतीत कपात

ही वॉच 13,999 रुपयांना खरेदी करता येईल

ही वॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे

OnePlus ने आपली पहिली स्मार्टवॉच म्हणजेच OnePlus Watch ची किंमत कमी केली आहे. कंपनीचे हे पहिले स्मार्टवॉच होते. वनप्लसने ते मागील वर्षी जुलैमध्ये लाँच केले होते. मिडनाईट ब्लॅक आणि मूनलाइट सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये येत असलेल्या या वॉचची किंमत 14,999 रुपये आहे. कंपनीने या वॉचच्या मूनलाइट कलर व्हेरियंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे. आता तुम्ही ते 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्हाला हे वॉच Amazon India वरून नवीन किंमतीसह खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा : 7700mAh बॅटरीसह Moto Tab G62 LTE ची सेल सुरू, तीन महिन्यांसाठी YouTube Premium मोफत

OnePlus वॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

वॉचमध्ये कंपनी 454×454 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.39-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देत आहे. यामध्ये कंपनी Amazfit मध्ये दिलेली रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम देत आहे. कॉम्पेनियन ऍपद्वारे वॉच फोनशी कनेक्ट केले जाऊ शकते.

वॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी अनेक मोड्सही देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये जॉगिंग आणि रनिंगसाठी ऑटोमॅटिक डिटेक्शन फीचर आहे. याशिवाय हे वॉच वापरकर्त्याच्या झोपेवर लक्ष ठेवण्यासोबत तणाव, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि हृदय गती यावर लक्ष ठेवते. वॉचमध्ये इनबिल्ट GPS देखील आहे.

IP68 रेटिंग असलेल्या या वॉचमध्ये पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी दोन आठवडे टिकते. वनप्लस वॉचमध्ये आणखी अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही हे वॉच OnePlus TV शी कनेक्ट करू शकता. विशेष म्हणजे टीव्ही पाहताना तुम्हाला झोप लागली तर ही वॉच आपोआप टीव्ही बंद करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo